Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या एसटी संप मिटेना – कर्मचाऱ्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सुरू केले चहाचे हाॅटेल व...

एसटी संप मिटेना – कर्मचाऱ्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सुरू केले चहाचे हाॅटेल व रसवंतीगृह

0
328

जामखेड प्रतिनिधी

              जामखेड न्युज – – – –
जवळपास चार महिने होत आले तरी एसटी संप विलगीकरणाच्या मागणीसाठी सुरूच आहे त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी चहाचे हाॅटेल तर काहीनी ऊसाचे रसवंतीगृह सुरू केले आहे चहा विकू पण संप सुरूच ठेवू अशी भावना बाळासाहेब सानप व ईश्वर सानप यांनी व्यक्त केली.
       एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करावे म्हणून गेल्या जवळपास चार महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार बंद आहे. आता कुटुंबाची उपासमारी होऊ लागली आहे त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही तरी केले पाहिजे म्हणून जामखेड तालुक्यातील साकत येथिल बाळासाहेब सानप यांनी रसवंतीगृह तर ईश्वर सानप यांनी चहाचे हाॅटेल सुरू केले आहे. हाॅटेल चालवू पण संप सुरूच ठेवू अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
      जामखेड तालुक्यातील साकत येथे श्री साकेश्वर रसवंतीगृह व टी सेंटर सुरू करण्यात आले आहे. यावेळी
ह. भ. प. उत्तम महाराज वराट, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, माजी पंचायत समिती सभापती व विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संजय वराट, माजी कृषी अधिकारी सुरेश वराट, माजी चेअरमन हनुमंत वराट, पोलीस पाटील महादेव वराट, राजस्थान ग्रेनाइट अॅड मार्बल चे संचालक शहादेव वराट, रामहरी वराट, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, बाळासाहेब सानप, ईश्वर सानप, वैभव सानप, संजय मुरुमकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    अनेक दिवसांपासून संप सुरू असल्याने पगार बंद आहेत त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही तरी करणे आवश्यक आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी चहाचे हाॅटेल, रसवंतीगृह सुरू करून उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!