बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात दोन पेपरमध्ये बदल

0
203
जामखेड न्युज – – – 
 बारावीच्या परीक्षेतील सर्वसाधारण आणि द्वीलक्षी तसेच व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकातील 5 आणि 7 मार्च रोजी दोन्ही सत्रात घेण्यात येणार्‍या विविध भाषांचे पेपर रद्द करण्यात आले असून संबंधित पेपर 5 आणि 7 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रक मंडळाने जारी केले आहे. बारावीची परीक्षा 4 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. आता दोन पेपर 5 आणी 7 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here