जामखेड न्युज – – – –
कर्जत-जामखेडचे भाग्य विधाते लोकप्रिय आमदार रोहित पवारांच्या वतीने श्री साकेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मास्क, कंपास व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना मास्क व कंपास मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.
यावेळी साकतचे सरपंच हनुमंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजू वराट, विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, दिनेश शिंदे, अशोक घोलप, जाहेद बागवान, सुलभा लवुळ, विजयकुमार हराळे, अतुल दळवी याच्या सह विद्यालयातील सर्व विद्यार्थी हजर होते.
आमदार रोहित पवार यांचा कोणताही सामाजिक उपक्रम हटकेच असतो. विकासकामांतही त्यांचा हात कोणी धरणार नाही. स्वतः च्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना एकूण 1 लाख १० हजार मास्क आणि 70 हजार आयुर्वेदिक वनस्पतींच्या रोपांची भेट दिली. होती
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था आणि रोहित पवार यांच्या संयुक्त विद्यमाने वाढदिवसानिमित्त ‘कोरोना’ च्या पार्श्वभूमी अरोग्य संवर्धान आणि पर्यावरण समतोल ही काळाची गरज असल्याचे लक्षात घेऊन विविध सामाजिक हिताचे आदर्श ठरतील असे उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कर्जत आणि जामखेड येथील शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी त्यांनी आयुर्वेदिक वनस्पतींची भेट दिली. विविध वृक्षांमुळे जैवविविधता आणि निसर्ग यांचा समतोल राखण्यास मदत होते. हे ओळखूनच आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून राज्याचे लक्ष वेधणारा उपक्रम येथे राबविण्यात आला.
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात राज्याचे लक्ष वेधणारे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत