जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड येथील भक्ती-शक्ती महोत्सव समितीच्या वतीने दि १३ ते २० फेब्रुवारी दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्रीमद देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ व कीर्तन महोत्सवात राज्यभरातील नामांकित कीर्तनकारांची किर्तने झाली उद्या रविवार दि. २० रोजी हभप रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात आपल्या ओघवत्या व रसाळ वाणी बद्दल प्रसिद्ध असलेल्या रामराव महाराज ढोक यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. जामखेड परिसरासाठी ही खरोखरच पर्वणी आहे.
गेल्या १३ वर्षपासून जामखेड शहरात भक्ती-शक्ती महोत्सव समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात याही वर्षी शहरातील शिवाजी नगर येथील जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेच्या बाजूला असलेल्या प्रागंणात भक्ती शक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भागवत कथा प्रवक्ते ह भ प भगवताचार्य नंदकिशोर महाराज पुराणिक (जालना) यांची दररोज सायंकाळी सहा ते आठ श्रीमद् देवी भागवत कथा झाली कथेसाठी व किर्तनासाठी जामखेड परिसरातील माता भगिनी व श्रोते मंडळींनी किर्तन व भागवत कथेचा आस्वाद घेतला. उद्या रविवारी हभप रामराव महाराज ढोक यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे
खालील किर्तनकारांनी आपली किर्तन सेवा दिली
रविवार दि १३ रोजी हभप शिवशाहीर आकाश महाराज भोंडवे,
सोमवार दि १४ रोजी हभप विश्वनाथ महाराज वारंगे शिवचरित्रकार
मंगळवार १५ रोजी शिवशाहीर हभप अविनाश महाराज वाघ
बुधवार दि १६ रोजी शिवशाहीर वासुदेव महाराज आर्वीकर,
गुरुवार दि १७ रोजी हभप विद्यावाचस्पती वारकरी ज्ञानेश्वर महाराज कदम,
शुक्रवार दि १८ रोजी हभप योगीराज महाराज गोसावी,.
शनिवार दि १९ रोजी हभप डॉ विकासानंद महाराज मिसाळ,
उद्या रविवार दि २० रोजी प्रसिद्ध रामायणाचार्य ह भ प गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सांगता होणार आहे
हा सप्ताहचे १४ वे वर्ष असून 8 दिवस सप्ताह दरम्यान प्रबोधनाचे मोठे काम झाले यात जास्तीत जास्त महिला नागरिक तरुण वर्गाने सहभाग घेतला यासाठी भक्ती-शक्ती महोत्सव समिती अध्यक्ष सोमनाथ पोकळे, उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, स्वागताध्यक्ष अमित चिंतामणी, कोषाध्यक्ष दीपक महाराज गायकवाड, सचिव अॅड प्रवीण सानप, ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय सोले पाटील, ओंकार झेंडे, मयूर नेटके, शिवम पोकळे, रवी बारस्कर, अमित पोटे, अण्णा मांजरे, गोरख घनवट, हरिदास गुंड, उत्कर्ष कुलकर्णी यांनी विशेष कष्ट घेतले.