Monday, March 30, 2026
Home ताज्या बातम्या डॉ. भगवानराव मुरुमकर यांच्या प्रयत्नातून पंचायत समिती मार्फत साकत गणातील 150 लाभार्थ्यांना...

डॉ. भगवानराव मुरुमकर यांच्या प्रयत्नातून पंचायत समिती मार्फत साकत गणातील 150 लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना – लाभार्थ्यांनी मानले मुरुमकर यांचे आभार

0
467
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – – – 
पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर मुरुमकर यांच्या प्रयत्नातून पंचायत समितीच्या माध्यमातून साकत गणातील सुमारे दिडशे लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून गायगोठा शेड, शेळीपालन शेड, विहिरी अशा प्रकारे लाभ मिळवून दिला आहे. दाखल केलेल्या सर्वांना काही ना काही लाभ झालेला आहे. राहिलेल्या सर्व प्रस्ताव मार्च अखेपर्यंत पुर्ण होणार आहे.
    डॉ. भगवानराव मुरुमकर म्हणजे नेहमी जनतेच्या सेवेत असणारे नेते आहेत तालुक्यातील कोणीही हॅलो म्हटले की, आलो असे त्यांचे धोरण आहे. मिसकाॅललाही परत फोन करून विचारपूस करणारा नेता म्हणून त्यांची ख्याती आहे.
साकत गणातील प्रत्येक गावात शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. वैयक्तिक लाभाच्या योजनेचे सर्व प्रस्ताव मार्च अखेर पूर्ण होतील असे जामखेड न्युजशी बोलताना डॉ. भगवानराव मुरुमकर यांनी सांगितले.
   जामखेड तालुक्यातील साकत गणातील
 घुलेवाडी,सतेवाडी,नायगाव येथे  सभापती  डाॅ भगवानदादा मुरुमकर यांनी  वैयक्तीक १२ लाभार्थी यांना गायगोठा,व शेळीपालन सेड,व विहीर मंजुर करुन दिले व त्याचे भुमीपुजन  पार पडले त्या प्रसंगी उपस्थित नायगाव, घुलेवाडी, सतेवाडीचे सरपंच आशोक तोंडे, ग्रा. प. सदस्य विनोद उगले, माजी ग्रा पं सदस्य  बाबासाहेब मुरकुटे, चेअरमन,  दिलीप शिकारे , प्रल्हाद पवार, सुखदेव काळे , चंदू काळे , बाळू काळे , बलभीम मुरकुटे , कांतीलाल घुले, सुरेश मुरकुटे,  राजेंद्र पवार, सुखदेव शिकारे, चंदु काळे , बाळु काळे ,डाॅ. पोपट हुलगुंडे,व घुलेवाडी ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहरी येथे सभापती मा डाॅ भगवान (दादा )मुरुमकर यांनी  वैयक्तीक १५ लाभार्थी यांना गायगोठा व शेळीपालन सेड मंजुर करुन दिले व त्याचे भुमीपुजन  पार पडले त्या प्रसंगी उपस्थित लक्ष्मण माने, नाना बारगजे, (चेअरमन) ग्रामरोजगार सेवक लहु आहेर. ग्रा पं. सदस्य मा भरत आहेर ,मा अशोक मेघडंबर  ,मा अशोक गिते ,मा भगवान हाके ,मा जनार्धन कांबळे ,मा आजीनाथ गिते ,मा मच्छिंद्र हाळनोर ,मा सुभास दुनगहु ,मा तुकाराम चव्हाण ,मा बापू ठोंबरे ,मा सदाशिव मेघडंबर ,मा नाना हाळणावर ,मा वामन टकले ,मा शिवाजी बाबर व मोहरी ग्रामस्त उपस्थित होते.
देवदैठण येथे सभापती मा डाॅ भगवान (दादा )मुरुमकर यांनी  वैयक्तीक लाभाचे गायगोटा,व शेळीपालन सेड मंजुर करुन दिले व त्याचे भुमीपुजन पार पडले, त्या प्रसंगी उपस्थित मा उप-सरपंच मा सुरेश भोरे,मा रामचंद्र नाना धेंडे,ग्रा पं सदस्य मा विजयकुमार धेंडे,मा महादेव उगले,मा पांडुरंग भोरे,मा राजु धेंडे,व देवदैठन ग्रामस्त.
श्री राम नगर(जायभायवाडी)  ता जामखेड येथे मा सभापती मा डाॅ भगवान (दादा )मुरुमकर यांनी  वैयक्तीक लाभाचे गायगोटा,व शेळीपालन सेड मंजुर करुन दिले व त्याचे भुमीपुजन आज  पार पडले,व श्रीराम मंदीराच्या समोर बाकडे चा लोकार्पन सोहळा पार पडला
 त्या प्रसंगी उपस्थित. सरपंच  एकनाथ जायभाय, शिवाजी जायभाय , सुभाष मुकादम , बाजीराव जनार्धन जायभाय, भागवत जायभाय ,भरत जायभाय ,ग्रामपंचायत सदस्य  विलास जायभाय, सचिन जायभाय , नानासाहेब जायभाय ,ग्रामपंचायत सदस्य भारत जायभाय ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, बालाजी जायभाय ,अंगद जायभाय , संपत महाराज जायभाय , सुरेश जायभाय, बाळासाहेब जायभाय, केशव भाऊ, बालाजी जायभाय यांच्या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!