Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या मित्राच्या वादात एकाची फायर दुसर्‍याचा चाकू हल्ला एकाचा मृत्यू

मित्राच्या वादात एकाची फायर दुसर्‍याचा चाकू हल्ला एकाचा मृत्यू

0
337
जामखेड न्युज – – – – 
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आढले खुर्द येथे एका वीस वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना आज (शुक्रवारी) सकाळच्या सुमारास घडली आहे.
विशेष म्हणजे दोघे नातेवाईक होते आणि समवयस्क असल्याने मित्रही होते. पण दोघांत काही कारणास्तव वाद झाला.
रोहन चंद्रकांत येवले असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अविनाश शिवाजी भोईर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. रोहन आणि अविनाश दोघेही नातेवाईक आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मृत रोहन आणि अविनाश यांच्यात दोन दिवसांपूर्वी काही कारणास्तव वाद झाला. एकमेकांना त्यांनी शिवीगाळ-धमकी देखील दिली.
याच झालेल्या वादाच्या रागातून आज शुक्रवारी सकाळी रोहनला घराबाहेर बोलावले गेले. त्यानंतर रोहन आणि अविनाश मध्ये  झटापट झाली आणि यातूनच अविनाशने सोबत आणलेल्या पिस्तूलातून रोहनच्या दिशेने गोळ्या झाडल्या. यात रोहन हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र, त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दुसरी कडे अविनाशला देखील झटापटीत जखमी झाला. अविनाशवर रोहनने चाकूने  हल्ला केला असे बोलले जातेय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरगाव पोलिस पुढील तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!