जामखेड न्युज – – – –
सध्या महाराष्ट्रात पुतण्या गँग खूपच सक्रीय झाली आहे, अशी जहरी टीका बीडचे काका नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर (Bharat Bhushan Kshirsagar) यांनी करत एकाच वाक्यात अनेकांवर टीका केली. बीडमधील काका डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि पुतणे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. मात्र यावेळी पुतण्या त्यांनी परळीत, बारामतीत आणि बीडमध्ये पुतण्या गँग सक्रिय आहेत, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनाही लक्ष्य केले.
ADVERTISEMENT 

पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी पदासाठी रक्ताचे नाते तोडले.सध्या महाराष्ट्रात पुतण्या गँग अधिकच सक्रिय झाली आहे. शहराच्या विकास कामात खोडा घालण्याचे काम कोणी केला असा सवाल उपस्थित करत राजकीय स्पर्धा असावी, मात्र ती विकासात अडथळा घालण्याची नसावी. मी ८८ कोटी आणले तर तुम्ही १०० कोटी आणा. तुम्ही आमदार व्हा म्हणून माझ्यात विष कालविण्याचे काम केले. ३५ वर्ष झाले मी नगराध्यक्ष आहे. माझे वय ६० वर्ष झाले मात्र मी कधीही आमदार होण्याचे बोललो नाही. रक्ताचे नाते तोडले, ही परंपरा आमची नाही, असे भारतभूषण क्षीरसागर म्हणाले.









