शिवसैनिकांच्या अडीअडचणी सेना भवनात तसेच मंत्रालयात लेखी स्वरूपात मांडून सोडवल्या जातील – कर्जत-जामखेड विधानसभा संपर्कप्रमुख – जनार्दन गालपगारे

0
303

जामखेड प्रतिनिधी

                      जामखेड न्युज – – – –

     मुख्यमंत्री शिवसेनेचा असुनही शिवसैनिकांची कामे मार्गी लागत नाहीत ही खरी खंत आहे. शिवसैनिकांनी आपापली कामे सांगावेत निश्चितच पाठपुरावा करण्यात येईल जिल्हाप्रमुख व मी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपल्या कामाचा नेहमी पाठपुरावा करत जा शिवसंपर्क अभियानांतर्गत गाव तिथे शाखा हे अभियान राबवले जाणार आहे. शिवसैनिकांच्या अडीअडचणी सेना भवनात तसेच मंत्रालयात लेखी स्वरूपात मांडून सोडवल्या जातील असे मत कर्जत-जामखेड विधानसभा संपर्क प्रमुख जनार्दन गालपगारे यांनी व्यक्त केले.
        शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख आणी महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना संपर्कमत्री नामदार दादाजी भुसे, संपर्क प्रमुख मा. संजय घाडी सहसंपर्कप्रमुख डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा कार्यकर्ता
 मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, कर्जत-जामखेड विधानसभा संपर्कप्रमुख जनार्दन गालपगारे, युवा सेना शहरप्रमुख पाथर्डी सचिन नागापुरे, राजू पटेल मुंबई, तालुकाप्रमुख संजय काशिद, युवा सेना तालुकाप्रमुख सावता हजारे, युवा सेना तालुकाउपप्रमुख तथा बावीचे सरपंच निलेश पवार, तालुकाउपप्रमुख गणेश उगले, बब्रुवान वाळुंजकर, मोहन जाधव, संतोष शिंदे, गणेश चव्हाण, बाळासाहेब रासकर, रविंद्र शिंदे, चंदन अंधारे, सुरज काळे, निलेश गायकवाड, आकाश मुळे, किरण ओझर्डे, बाळू डुचे, गहिनीनाथ जगताप, अरविंद गुजर ठाकरे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
   
       यावेळी बोलताना गालपगारे म्हणाले की, शिवसंपर्क अभियानांतर्गत गाव तिथे शाखा हे अभियान राबवले जाणार आहे. कार्यकर्ता टिकला पाहिजे कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना मी सेना भवनात मांडणार आहे. सर्व तक्रारी लेखी स्वरूपात मांडणार आहे. शिवसैनिकांच्या सर्व अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.
      यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले की, येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार आहे व शिवसेनेची ताकद दाखवून देणार आहे असाही इशारा दिला. तरीही अंतिम निर्णय शिवसेना प्रमुख घेतील असेही जिल्हा प्रमुख यांनी सांगितले.
शिवसैनिकांनी आपापली कामे लेखी स्वरूपात माझ्याकडे द्या लवकरात लवकर अधिकारी वर्गासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू. संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून आपण आपल्या अडीअडचणी सेना भवन व मंत्रालयापर्यंत आपण पाठपुरावा करू व कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.
     शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद म्हणाले की, पक्षाचे संघटन मजबूत झाले पाहिजे अशी पक्षाची अपेक्षा असते पण पक्षाचे संघटन मजबूत होण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे कामे होणे आवश्यक आहे. पण कामे होत नाहीत अशी खंत व्यक्त केली. वरिष्ठांनी कार्यकर्त्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतील यासाठी प्रयत्न करावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here