Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या संत गाडगेबाबा श्रेष्ठ समाजसुधारक होते. –  प्रा. मधुकर राळेभात 

संत गाडगेबाबा श्रेष्ठ समाजसुधारक होते. –  प्रा. मधुकर राळेभात 

0
206
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – 
अमरावती जिल्ह्यात जन्म घेतलेल्या संत गाडगेबाबांनी  महाराष्ट्रभर भ्रमंती करून कीर्तनातून जनजागृती केली. निरपेक्षभावाने त्यांनी आपले आयुष्य लोकोद्धारासाठी,
खेड्यापाड्यातील दारिद्र्य व अंद्धश्रद्धा दूर करण्यासाठी झिजविले.संत गाडगेबाबा श्रेष्ठ समाज सुधारक होते ” असे विचार ज्येष्ठ सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्ते प्रा मधुकर
राळेभात यांनी व्यक्त केले.
    मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेडच्या वतीने  हाळगाव येथे ग्रामपंचायत प्रांगणात संत गाडगेबाबांची ६५ वी पुण्यतिथी सरपंच सौ अनिता सुशेन ढवळे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच साजरी झाली, त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.राळेभात बोलत होते. सुरूवातीस मान्यवरांचे हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. प्रास्ताविक भाषणात ग्रामसेवक श्रीमती  निलिमा कुबसंगी यांनी प्रा. राळेभात, प्रसिद्ध साहित्यिक
प्रा.आ.य.पवार व लेखक नागेश शेलार यांचा परिचय सांगितला. सेवा सोसायटीचे चेअरमन किसनरावबापू ढवळे व उपसरपंच अशोक रंधवे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन प्रा.राळेभात, साहित्यिक पवार व लेखक शेलार यांचा सत्कार करण्यात आला.
प्रा.आ.य.पवारांनी   मानवी जीवनासाठी वृक्षांचे महत्त्व सांगून संत गाडगेबाबांच्या विचारांची  आजच्या काळास नितांत गरज असल्याचे सांगितले,व स्वलिखित दोन ग्रंथ ग्रामपंचायला भेट दिले.
कवी नागेश शेलार यांनी खेड्यापाड्यातील अंद्धश्रद्धेवर
संत गाडगेबाबांनी सतत प्रहार केले,असे सांगून  दोन कविता गाऊन दाखविल्या.सर्व उपस्थितांनी कार्यक्रमास  टाळ्यांच्या गजरात दाद दिली. सर्व ग्रामस्थांना हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आवडल्याचे सरपंच
सौ अनिता ढवळे यांनी सांगितले व मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले.सदर कार्यक्रमास सेवा सोसायटीचे चेअरमन किसनराव बापू ढवळे, उपसरपंच अशोक रंधवे, माजी सरपंच राजेंद्र ढवळे, दगडू पुराने, शांतीलाल लांडे, मारूती करगळ, बन्सी जामदार,  शिक्षिका पाचारणे , शांताबाई हिरवे, छायाताई कापसे आदी मान्यवरांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!