पोलीसांची धडक कारवाई, गावठी दारू अड्ड्यावर छापा. साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

0
432
जामखेड न्युज – – – 
 आज शुक्रवार  दि.  19/10/2021 रोजी उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत  गोंधवणी परिसरात, वडारवाडा येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने  पोलिसांनी सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील  कच्चे रसायन, 7800  लिटर ,तयार गावठी हातभट्टी दारू 248  लिटर   व तसेच 50 किलो नवसागर , देशी दारू, तसेच 450  किलो गुळ एक टेंपो व  एक दुचाकी असा एकूण 6,43,955  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात  आले आहे .
 त्यानुसार आरोपी
1) श्रीकांत प्रभाकर काळे, रा कदम वस्ती  श्रीरामपूर
2)  सागर माणिक शिंदे, रा. गोंधवणी ता श्रीरामपूर
3)  भीमराव काळे रा अशोक नगर ता  श्रीरामपूर
4)   दत्तात्रेय जानकीराम मंचरे रा वैजापूर
5) दीपक वसंत शेलार रा अशोक नगर
6)  अशोक काशिनाथ शिंदे( फरार)
7) बाप्पू नागू गायकवाड ( फरार)
8) अर्जुन फुलारे ( फरार) सर्व  राहणार गोंधवणी वडारवाडा ता श्रीरामपूर   यांचेविरुध्द  महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(फ) ( क) ,( ड), (  इ) नुसार P.C.  नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीनुसार  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन  व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय श्रीरामपूर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
सदरची कारवाई  मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक,डॉ. दिपाली काळे,  गणेश पाटील ,पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क  यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p  संदीप मिटके, Dy s.p. नितेश शेंडे ( राज्य उत्पादन शुल्क),P.I. कोल्हे, P.I.  हुलगे, P.I, वाजे व इतर अधिकारी व अंमलदार आदींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here