Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या रोहितला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय, नाही तर हिसका दाखवला असता –...

रोहितला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय, नाही तर हिसका दाखवला असता – अजित पवार

0
316
जामखेड प्रतिनिधी 
            जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या पुढाकारातून होत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar in Karjat Jamkhed) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचे भाषण सुरू असताना प्रेक्षकांमधून काही जण विविध मागण्या व सूचना करत होते. शेवटी अजित पवार यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये त्यांचा समाचार घेतला. ‘तुला लईच कळतंय रं. येथे येऊन भाषण कर. आमच्या बारामतीत मी बोलायला लागलो की सगळे चिडीचूप असतात. येथे उगीच रोहितला त्रास होईल म्हणून ऐकून घेतोय, नाही तर हिसका दाखविला असता,’ अशा शब्दांत मध्येमध्ये बोलणाऱ्यांना अजितदादांनी सुनावले.
                         ADVERTISEMENT 
या कार्यक्रमात पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. कामांची माहिती देत असताना प्रेक्षकांमधून काही जण त्यांना सूचना करीत होते. वीज पुरवठा, शेतीमालाचा भाव वगैरे संबंधी मुद्दे मांडत होते. एक दोनदा दुर्लक्ष केल्यानंतर अखेर पवार भडकलेच. एकाला उददेशून ते म्हणाले, ‘तुला लईच कळतंय रं. येथे येऊन भाषण कर. आम्ही काय असेच उठून आलेलो नाही. सात वेळा दीड दीड लाख मते घेऊन निवडून आलो आहोत. आमच्या बारामतीत असे कोणी मध्ये बोलत नाही. मी बोलत असताना लोक चिडीचूप असतात. येथे मध्ये मध्ये बोलायची सवय आहे. उगीच रोहितला त्रास व्हायला नको म्हणून ऐकून घेतो. नाही तर माझा हिसका दाखविला असता. ऐकून घेतोय तर मध्ये मध्येच बोलतात,’ असे पवार यांनी सुनावल्यानंतर सगळेच शांत झाले.
                           ADVERTISEMENT  
राम शिंदेंनाही लगावला टोला
कामांवरून श्रेयवादाचे राजकारण या मतदारसंघात चालते. त्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनाही टोला लगावला. ‘रोहित पवार यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका. जी कामे तुम्ही केली, ती आम्ही मान्य करतो, तशी आमची कामे तुम्ही मान्य करा. लोकांनी तुम्हाला नाकारले आहे. आता गपगुमान बसा. आपण कुठे कमी पडलो याचे आत्मचिंतन करा. त्यातून बोध घ्या. चांगल्या कामाचे कौतुक करायला शिका. फुकटचे श्रेय घेऊ नका. उगीच ढुसण्या देत बसण्यात काय अर्थ आहे?,’ असा चिमटाही पवार यांनी शिंदे यांना काढला.
                    ADVERTISEMENT 
   माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला!!! 
जामखेड शहराच्या पाणीपुरवठय़ाच्या श्रेयवादावरून भाजपा व राष्ट्रवादी वातावरण तापले आहे विधानसभा निवडणुकीच्या आगोदर जामखेड शहराच्या पाणीपुरवठ्याची तत्वत: मान्यतेचा कागद दाखवला होता व आम्हीच पाणीपुरवठा योजना मंजूर केली असे भाजपा सांगत आहे याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, मी इतक्या दिवस सरकारमध्ये काम करीत आहे पण तत्वत:  मान्यता काय असते ? हे माहित नाही. विरोधकांनी थातूरमातूर कागद दाखवलेला होता हवेत बाण सोडण्यात विरोधक पटाईत आहेत असे पवार म्हणाले.
                       ADVERTISEMENT  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!