जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साकत फाटा बीड रोड जामखेड याठिकाणी नवज्योत प्रकल्प सुरू केला असून या प्रकल्पातील वृद्ध व मुलांसमवेत जामखेड मधील नामांकीत न्यु महाराष्ट्र बेकर्स चे मालक गौरव शेठ गंभीर यांनी शुभदिप व संदिप या मुलांचा वाढदिवस नवज्योत प्रकल्पातील वृद्ध व मुलांसमवेत साजरा केला व या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना व वृद्धांना अल्पोपहार देण्यात आला. त्याचबरोबर किराणा मालाची देखील मदत करण्यात आली. संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व माहितीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक संतोष गर्जे यांनी श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
गौरव शेठ गंभीर यांनी बोलताना सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून नव्याने सुरू झालेल्या वृद्धाश्रमासाठी शुभेच्छा देत मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किराणा व अल्पोहाराची मदत केली असून पुढील काळात वेळोवेळी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. व शहरातील इतर कार्यकर्त्यांनी देखील स्वतः च्या किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीच्या वाढदिवसाला इतरत्र खर्च टाळून अनाथ, निराधार, गोरगरीब मुलांना व वृद्धांना मदत करत नवज्योत आश्रमामध्ये वाढदिवस साजरे करण्याचे आवाहन केले.
यावेळी बापूसाहेब गायकवाड, उषा गंभीर, कोमल गंभीर, लिना गंभीर, पत्रकार धनराज पवार यांच्यासह गंभीर परिवारातील व प्रकल्पातील लहान मुले व वृद्ध उपस्थित होते.






