जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
एका महिन्यांपूर्वी तालुक्यातील कोल्हेवाडी येथे दिवसा घरफोडी करत चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. तशी फिर्याद जामखेड पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सापळा रचून चोरी करणारा आरोपी व मुद्देमाल हस्तगत केला आहे त्यामुळे जामखेड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
दिनांक 15/09/2021 रोजी सकाळी 10/00 ते 17/00 वा.च्या सुमारास फिर्यादी -कैलास रघुनाथ सोडंगे
वय- 30 रा. धंदा-शेती रा. कोल्हेवाडी ता.जामखेङ जि.अ.नगर यांच्या फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.420 2021 भादवि कलम 454,380 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता.(- 28/245.२24)
सदर गुन्ह्याचा तपास संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक जामखेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस
उपनिरीक्षक राजु थोरात व गुन्हे शोध पथक करीत होते. गुन्हयाचा शोध करीत असताना पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात व गुन्हे शोध पथकाचे इतर पोलीस अंमलदार यांना चोरी करणारा आरोपी अनिकेत सुभाष सोंङगे रा.कोल्हेवाडी ता.जामखेड जि.अ.नगर हा असल्याचे खात्रीशिर समजले. सदर आरोपीस पकडणेकामी कोल्हेवाडी गावात सापळा रचुन ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता आरोपीने गुन्हयाची कबुली दिली असुन त्याच्याकडुन घरफोडीतील मुद्देमाल तपासादरम्यान हस्तगत करण्यात आला आहे.
जामखेड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास त्याचा सुगावा लागल्याने अखेर सदर गुन्हयात आरोपी
अनिकेत सुभाष सोडंगे रा.कोल्हेवाडी ता.जामखेड जि.अ.नगर यास अटक करून त्याच्याकडुन 2,00,000 (2 लाख रुपये) गेला मुद्देमाल हस्तगत करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील, मा.अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, मा.उपविभागीय पोलीस अधिकार अण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पो.उप.नि.राजु थोरात, ,पोलिस हेड कॉन्स्टेबल लाटे, पोलिस नाईक अविनाश ढेरे,
पोकॉ.संग्राम जाधव, पोकॉ.संदिप राऊत, पोकॉ.विजय कोळी, पोकॉ.आबा आवारे, पोकॉ.अरूण पवार, पो कॉ. सचिन देवढे, पोकॉ.आजबे यांनी केली आहे.






