जामखेड न्युज – – –
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती बिघडल्याने तीन दिवसांपूर्वीच त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, आज दुपारपासून सोशल मीडियावर मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याची अफवा पसरवली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना डेंग्यू असल्याचे आढळून आले आहे. परंतु, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. एम्सच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.
रुग्णालयातील एका रुग्णाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंह असल्याचा दावा केला जात आहे. या फोटोसोबत मनमोहन सिंह यांचे निधन झाल्याचंही म्हटले आहे. मात्र, या सर्व गोष्टी असत्य आहेत.






