Sunday, February 15, 2026
Home ताज्या बातम्या येत्या निवडणुकीत शिवसेना चमकदार कामगिरी करणार – नामदार शंकरराव गडाख

येत्या निवडणुकीत शिवसेना चमकदार कामगिरी करणार – नामदार शंकरराव गडाख

0
225
जामखेड प्रतिनिधी 
      जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
 शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवुन काम करत असतो. सत्तेच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अनेक विकासाचे प्रश्न सोडवले असुन समाजात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. येत्या काळात उर्वरीत प्रश्न सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कर्जत तालुक्यात शिवसेना नव्या जोमाने काम करत असुन येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नक्कीच शिवसेनेच्या जागा वाढतील असे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.
      ना.शंकरराव गडाख यांच्या हस्ते आज कर्जत तालुक्यात शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराचे औपचारिक उदघाटन  तसेच ९ ठिकाणी शिवसेना शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणी आणी तालुका प्रमुख बळीराम आण्णा यादव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
    ८० % समाजकारण व २० टक्के राजकारण या तत्त्वावर शिवसेना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय धाडी सहसंपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात शिवसेनेची घोडदौड सुरू आहे.
      यावेळी युवासेना तालुका प्रमुख दीपक गांगर्डे, उपतालुकप्रमुख शिवाजी नवले, माजी पंचायत समिती सदस्य अमृत लिंगडे, विभाग प्रमुख पोपट धनवडे, सुभाष जाधव आणी अनेक शिवसैनिक हजर होते.
      शिवसेनेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या आरोग्य शिबिराचा सर्व लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी प्रसिद्धी प्रमुख प्रविण अनभुले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!