जामखेड न्युज – –
कर्जत तालुक्यातील डोंबाळवाडी गावाच्या शिवारामध्ये बबन बापू कुऱ्हाडे, रघुनाथ मारुती मासाळ , दादा कोंडीबा मासाळ, नवनाथ जगन्नाथ मासाळ व इतर दोन नातेवाईक असे सर्वजण दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये काम करत होते. यापैकी बबन कुऱ्हाडे व रघुनाथ मासाळ हे दोघेजण त्यांच्याकडील शेळ्यामेंढ्या चार देण्याचे काम करत असताना शेजारी असणाऱ्या बाजरीच्या पिकांमध्ये बबन यांना हालचाल दिसली असता त्यांनी ही माहिती रघुनाथ मासाळ यांना सांगितली, बाजरीच्या पिकामध्ये कसलेतरी जनावर आहे एवढी खात्री झाल्यानंतर आपल्या शेळ्या मेंढ्या चे रक्षण करण्यासाठी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न ओरडून या दोघांनी केला, बबन कुराडे याच्या हातामध्ये काठी होती तर रघुनाथ मासाळ यांच्याकडे कुऱ्हड होती दोघेजण बाजरीच्या पिकच्या परिसरात जोरात ओरडून त्या अज्ञात प्राण्याला हुसकावण्याचा प्रयत्न करत असताना, अकस्मात लपलेला बिबट्याने बबन कुराडे यांच्या अंगावर बाजरी च्या पिकांमधून मधून थेट अंगावर झडप घातली , व खाली पाडले, उजव्या हाताचा दंडाच्या लचका तोडला तसेच छातीच्या कडेला चावा घेतला दरम्यान शेजारी उभा असलेले रघुनाथ मासाळ हे यात अचानक घडलेल्या घटनेने घाबरून गेले. मात्र तशाही परिस्थितीमध्ये जिवाच्या आकांताने ती जोरात ओरडल्याने पलिकडे शेतामध्ये असणारे दादा मासाळ नवनाथ मासाळ व इतर दोघे जण त्याठिकाणी पळत आले व सर्वजण जोरदार आरडा-ओरडा केल्याने बिबट्याने तिथून पुन्हा बाजरीच्या पिकामध्ये उडी घेऊन पळून गेला.
आकस्मात हल्ला झाल्याने बबन कुराडे व रघुनाथ मासाळ हे दोघेजण प्रचंड घाबरलेले होते तशाही परिस्थितीमध्ये इतरांनी त्यांना धीर देऊन खाजगी गाडीतून कर्जत उपजिल्हा रुग्णालय साठी तात्काळ आणले. प्राथमिक उपचार करून जखम खोलवर असल्यामुळे व आवश्यक असणारी इंजेक्शन उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे बबन कुऱ्हाडे यांना तातडीने नगर येथे हलविण्यात आले.
बिबट्याने हल्ला केल्याची माहिती काही क्षणात वेळातच सर्वत्र पसरल्यामुळे नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. दरम्यान वन विभागाचे अधिकारी सागर केदार यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले आहे
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर
उपजिल्हा रुग्णालय मध्ये येऊन जखमी झालेले बबन कुराडे यांची भेट घेतली तसेच तेथील डॉक्टरांशी चर्चा केली. वन विभागाचे अधिकारी यांना फोन करून तातडीने डोंबाळवाडी परिसरांमध्ये पथक पाठवून त्या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी करताना नागरिकांमध्ये या घटनेमुळे घबराट पसरली आहे तरी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हालचाल करावी असे सांगितले. ग्रामसेवक विकास सामसे यांनी देखील जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.