इगो बाजुला ठेवून सर्वानी एकत्र यावे जगदंबा देवीचा उत्सव रूढीपरंपरेनुसार साजरा करू – आ. रोहित पवार

0
246
जामखेड न्युज – – – 
 गणपती बाप्पा गेले आणि आता अवघ्या काही दिवसांवर नवरात्रीचा सणयेऊन ठेपला आहे. यामुळे सर्वत्र याची तयारी सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.
 महाराष्ट्राचे आराध्य दैवत कर्जत तालुक्यातील राशीन येथील जगदंबा देवीचा नवरात्र उत्सव व पालखी सोहळ्याचे चांगले नियोजन करु व राशीनचा यात्रा उत्सव सर्वांच्या सहकार्याने पार पाडू असे आश्वासन आ. रोहित पवार यांनी दिले.
तसेच यावेळी बोलताना पवार म्हणाले कि, नवरात्र उत्सव रुढीपरंपरेनुसार साजरा केला जाईल. त्यासाठी इगो बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन यात्रा उत्सव पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे.
तसेच पालखी सोहळ्याबाबत ११ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक घेऊ असे सांगितले. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरणाबात बोलताना पवार म्हणाले कि, पुढील चार दिवसांमध्ये राशीनसह १२ वाड्यातील जनतेने लसीकरण मोहीम राबवून प्रशासनास सहकार्य करावे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे. असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. आयोजित बैठकीदरम्यान आरतीच्यावेळी उपस्थित राहणे,
पोलीस प्रशासनास मदत करण्यासाठी पथक तयार करणे, भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे पाच ते रात्री एक वाजेपर्यंत मंदिर चालू ठेवणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here