Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या घाटमाथ्यावर सोयाबीन पीक, काढुन ठेवलेल्या मुठी पाण्यात तर लावून ठेवलेल्या बुचाडाभोवती तळे,...

घाटमाथ्यावर सोयाबीन पीक, काढुन ठेवलेल्या मुठी पाण्यात तर लावून ठेवलेल्या बुचाडाभोवती तळे, शेतकरी दुहेरी संकटात

0
351
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
    सोयबीन पाण्यात काढलेल्या मुठी पाण्यात आणि सोयाबीन काढुन लावलेल्या बुचाडाभोवती तळे अशा पद्धतीने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दैना अतिवृष्टीने झाली आहे. गुडघाभर चिखलात एक एक सोयाबीनचा ठोंब गोळा करून डोक्यावर वाहत कसेबसे बुचाड लावले तर दररोजच होत असलेल्या पावसामुळे बुचाडाभोवती तळे झालेले दिसत आहे. एक तर सोयाबीनचा भाव निम्म्याने घटले आहेत यातच हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे अशी परिस्थिती साकत परिसरात निर्माण झाली आहे. एकतर भाव पडलेले यातच अतिवृष्टीने नुकसान यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
      घाटमाथ्यावर साकतला सोयाबीनचे कोठार समजले जाते. या वर्षी जुनच्या सुरूवातीला सोयाबीन पीकाची पेरणी झाली होती. मध्यंतरी फुलांच्या व शेंगा लागवडीच्या आसपास पावसाने ओढ दिली होती तरीही पीके बरी होती. आता पंधरा दिवसांपासून सोयाबीन काढणीला सुरूवात झाली आहे. पण घाटमाथ्यावर दररोजच पाऊस होत आहे यामुळे बहुसंख्य शेतात तळे साचलेले आहे. अनेकांचे सोयाबीन पाण्यात आहे. काहींच्या मुठी पाण्यात आहेत तर सोयाबीन काढून ठेवलेले बुचाडे लावलेल्या भोवती तळे साचलेले आहे त्यामुळे सध्या घाटमाथ्यावरील सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एकतर निम्म्यावर घटलेले सोयाबीनचे भाव आणी आता अतिवृष्टीने होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
       शेतकऱ्यांची ऐंशी ते नव्वद रूपये किलोचे बियाणे पेरणीसाठी घेतले एका एकर साठी पंचवीस ते तीस किलो बियाणे लागते एक रासायनिक खताची बॅग तसेच ट्रॅक्टर किंवा बैलाच्या साहाय्याने पेरणी केली जाते अडीच ते तीन हजार रुपये बियाणे दिड हजार खताची बॅग पेरणीसाठी दोन हजार अशा प्रकारे साडे सहा ते सात हजार रुपये खर्च आगोदर शेती नांगरट मोगडा पाळी पाच हजार रुपये एकुण बारा ते पंधरा हजार रुपये खर्च तसेच पिकांची खुरपण नंतर औषध फवारणी तीन ते चार हजार रुपये व काढणीसाठी पाच हजार रुपये अशा प्रकारे पंचवीस हजार रुपये साधारण एकरी खर्च येत आहे नंतर मळणी यंत्रात भरडणे जवळपास तीस हजार रुपये खर्च येतो तरीही शेतकरी भाव चांगला असल्याने आनंदी होता पण अचानक भाव पडल्याने आनंदावर विरजण पडले आहे.
     एकरी पाच ते दहा क्विंटल उत्पादन होते पाच हजार रुपये भाव व पाच क्विंटल उत्पादन गृहित धरले तर शेतकरी तोट्यात आहे सरासरीने आठ क्विंटल उत्पादन धरले तर सध्या साडेचार हजार रुपये भाव आहे तेव्हा छत्तीस हजार रुपये होतात व खर्च तीस ते बत्तीस हजार रुपये तेही चांगला माल असेल तर पण सध्या अतिवृष्टीने माल खराब होत आहे.
    घाटमाथ्यावरील भाग भौगोलिक दृष्ट्या मराठवाडय़ात मोडतो पण प्रशासकीय दृष्टीने तो पश्चिम महाराष्ट्रात आहे. सध्या जामखेड तालुक्यात पाच पर्जन्यमापक यंत्र आहेत. घाटमाथ्यावर एकही पर्जन्यमापक यंत्र नाही त्यामुळे रोज पाऊस आसतानाही जामखेड ला पाऊस असेल तरच पावसाची नोंद होते. घाटमाथ्यावर मात्र दररोज पाऊस असतो तरीही कमी पावसाची नोंद होते घाटमाथ्यावर साकत येथे पर्जन्यमापक बसवावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे.
     भौगोलिकदृष्टय़ा घाटमाथ्यावरील भाग मराठवाडय़ात मोडतो पण मराठवाड्याला मिळणाऱ्या सवलती या भागाला मिळत नाहीत. जेवढे मराठवाडय़ात नुकसान झाले आहे तेवढेच नुकसान घाटमाथ्यावर झालेले आहे अनेकांची पीके, मुठी पाण्यात आहेत तर सोयाबीन लावून ठेवलेल्या बुचाडाभोवती पाणीच पाणी आहे तळे साचले आहे तेव्हा प्रशासनाने ताबडतोब नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करावेत तसेच विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमा कसा मिळेल यासाठी विमा कंपनीनेही पाहणी करावी अशी मागणी शेतकरी नागनाथ मुरुमकर यांनी केले आहे.
    चौकट
सोयाबीनचे भाव निम्म्याने घटले पण खाद्यतेलाचे भाव मात्र चढेच आहेत असे का ❓ असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीनचे दर पडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!