Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या ‘मुका’ घेण्याचं ते वक्तव्य प्रवीण दरेकरांना पडणार महागात, रुपाली चाकणकर यांची पोलिसात...

‘मुका’ घेण्याचं ते वक्तव्य प्रवीण दरेकरांना पडणार महागात, रुपाली चाकणकर यांची पोलिसात तक्रार

0
229
जामखेड न्युज 
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुण्यात सिंहगड पोलीस ठाण्यात प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.  काही दिवसांपूर्वी शिरुर इथे एका कार्यक्रमात प्रवीण दरेकर यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुके घेणार पक्ष’ असं वक्तव्य केलं होतं. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून दरेकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे, प्रविण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी. कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेल या उद्देशाने याबाबत मी पुण्यात FIR दखल केलं आहे.
प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले होते?
पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे. सुभेदारांचा पक्ष, कारखानदारांचा पक्ष, बँकावाल्यांचा पक्ष, उद्योगपतींचा पक्ष आहे. मात्र भाजप हा सर्वसामान्यांचा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं प्रवीण दरेकर म्हणाले. दरेकरांच्या बोलण्याला राष्ट्रवादीत सुरु असलेल्या पक्षप्रवेशची पार्श्वभूमी होती. सुप्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.
रुपाली चाकणकरांचा दरेकरांवर हल्लाबोल
दरम्यान, प्रवीण दरेकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. “तुमच्या बोलण्यावरुन तुमच्या पक्षाची संस्कृती काय आहे हे दिसून येतं. प्रवीणजी दरेकर आपण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय, त्याच्याबद्दल आपण महिलांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू शकतो याची सुद्धा जाणीव आपण ठेवावी”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!