भारत पाक बॉर्डरचा बाप्पा राजा स्वराज एक्स्प्रेसने जम्मू आणि काश्मीर येथील पुछं या ठिकाणी रवाना

0
299
जामखेड न्युज – – – 
भारत पाक सीमा रेषेवरील (LOC) पुछँ या गावी सालाबाद प्रमाणे यंदाही भारतीय फौजी जवानांसोबत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईत बाप्पाची आकर्षक मूर्ती दिव्यांग मूर्तीकार विक्रांत पांढरे यांनी सिद्धिविनायक चित्र शाळा कुर्ला या ठिकाणी मनमोहक बाप्पाची मूर्ती साकारली आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता कुर्ला येथील सिद्धिविनायक चित्र शाळेतून बाप्पाची मूर्ती मुंबईतील बांद्रा स्थानकातून स्वराज एक्स्प्रेसने पुछं गावाकडे रवाना करण्यात येणार आहे.भारत पाक बॉर्डरच्या राजाचे स्वागत करण्यासाठी सिद्धिविनायक चित्र शाळेत ईशर दिदी मानवाधिकार कार्यकर्ता कार्याध्यक्ष प्रोग्रेसिव्ह नेशन्स एन. जी.ओ. तथा प्राचीन शिव दुर्गा भैरव मंदिर ट्रस्ट उपाध्यक्षा जिल्हा पुछं जम्मू काश्मीर व छत्रपती दादा आवटे प्रोग्रेसिव्ह नेशन्स एन. जी.ओ. किंग ऑफ़ (LOC) व अध्यक्ष शिवनेर प्रतिष्ठान ,मनपा प्रशासकीय अधिकारी जालिंदर चकोर ,मंगेश मस्तुद,प्रमोद चव्हाण, नौसेना अधिकारी, आरोग्य अधिकारी, महानगर अधिकारी, ट्राफिक व पोलीस अधिकारी, रेल्वे अधिकारी, हमाल संघटना आणि प्रोग्रेसिव्ह नेशन्स संस्चेचे सर्व कार्यकर्ते तसेच असंख्य गणेशभक्त उपस्थित होते.
मंगळवारी सायंकाळी भारतीय सैनिकांकडून या राजाचं गुलाल उधळत, तिरंगा फडकवत जंगी स्वागत करण्यात येणार आहे तसेच रविवारी शिक्षक दिन असल्यामुळे कोरोना काळात स्वत जिवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्याचे मोलाचे कार्य करणारे तसेच कोरोना विषाणूंचा महामारीत पालक गमावलेल्या १० बालकांना दत्तक घेऊन शिक्षणाचा खर्च उचलणारे शिक्षक व उदरनिर्वाह करण्याकरिता रिक्षाचालक दत्तात्रय सावंत यांचा सत्कार प्रोग्रेसिव्ह नेशन्स एन. जी.ओ.च्या वतीने करण्यात आला.
अफगाणिस्तानातील वातावरणामुळे भारत-पाक बाॅर्डरवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिसंवेदनशील परिस्थितीचा सामना करण्यास आपले भारतीय सैन्य २४ तास डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत. अश्या संवेदनशील परिस्थितीतही दरवर्षी प्रमाणे यावेळी ही गणेशोत्सव साजरा करू, असा भारतीय सैनिकांचा विश्वास आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, या आत्मविश्वासाने मुंबईहून ईशरदिदी बाप्पाची मुर्ती घेऊन जाणार आहेत. ईशरदिदींना या निर्णय कार्यात त्यांचे मुंबईतील सहकारी छत्रपती आवटेदादा (अध्यक्ष) व प्रोग्रेसिव नेशन टीम ची पूर्ण साथ आहे. दरवर्षी भारत पाक बॉर्डरच्या राजाची मूर्ती जम्मू काश्मीर पुछं या ठिकाणी पाठविली जाते हे मंडळाचे ६ वे वर्ष आहे.
२०१९ मध्ये काश्मीर मधील  ३७० आणि ३५ ( ए ) कलम रद्द केल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पुंछ मध्ये मोठी सुरक्षा पुरवण्यात आली होती. तर २०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांना अनुसरून हा उत्सव साजरा करण्यात आला होता तर यंदा २०२१ तालिबानने अफगाणिस्तानवर आक्रमण करून सत्ता काबीज केल्याने संपूर्ण जगात  भीतीचे, आणि एलओसी वर तणावाचे  वातावरण आहे.
पुंछ गावापासून अफगाणिस्तानातील काबूल शहर ६०० किमी अंतरावर असल्याने देशाच्या सीमेवर यंदाही सुरक्षा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे. अनिश्चिततेच्या वातावरणामुळे बॉर्डरच्या राजाच्या प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. तरीही ५ सप्टेंबर रोजी वांद्रे स्थानकातून स्वराज्य एक्स्प्रेसने गणेशमूर्ती पुंछला रवाना करण्यात येणार आहे.
गणपती बाप्पाचे दैनंदिन कार्यक्रम
गणपती बाप्पाची स्थापना जम्मू काश्मीर मधील पुछं जिल्ह्यात बर्फाळ वातावरणात होते. एवढ्या थंड वातावरणात पहाटे चार वाजता बाप्पाची पूजा आरती केली जाते. सायंकाळी चार वाजता स्थानिक महिला मंडळ व लहान मुले संगीत भजनाचा कार्यक्रम करतात. सायंकाळी सात वाजता सैनिकांच्या उपस्थितीत महा आरती केली जाते. अनंत चतुर्थीच्या दिवशी पुछं जिल्ह्यातील शेर-ए-कश्मीर पुलाजवळील पुलस्थ नदीत( king of LOC) भारत पाक बोर्डारच्या राजाचे विसर्जन केले जाते.
गणपती उत्सव साजरा करण्याचा उद्देश
हा उत्सव साजरा करण्यामागील उद्देश असा आहे की दिवस रात्र सीमेवर डोळ्यात तेल घालुन देशाची सुरक्षा करणारे आपले भारतीय सैनिक आपल्या घरी कोणताही सण उत्सव साजरा करण्यासाठी जाऊ शकत नाहीत. त्यांना हा गणेशोत्सव आपला समजून पूर्ण भक्ति भावाने आनंदाने या उत्सवात सहभागी होतात संपूर्ण भारतीयांना सुरक्षित ठेवणारे व रोज तणावपूर्ण वातावरणात असणारे आपले भारतीय सैनिकांना मानसिक आणि आध्यात्मिक शांती प्राप्त होते. गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या उद्देशाने हा गणेशोत्सव सुरू केला.याच विचाराने प्रेरित होऊन मानव अधिकार कार्यकर्त्या ईशर दिदी यांनी स्वतःला या कार्यासाठी समर्पित केले आहे. जेणे करून सीमा भागातील जनतेमध्ये एकता, समता, बंधुभाव, निर्माण व्हावा. व आपल्या सैनिकाचे मनोबल वाढावे या कार्यासाठी कोणत्याही व्यक्तीकडून कुठल्याही स्वरूपाची आर्थिक मदत घेतली जात नाही. हा संपूर्ण खर्च ईशर दिदी व पुछं गावी स्थायिक त्याचा परिवार करतो. या कामी मुंबईतील स्थानिक सहकारी प्रोग्रेसिव्ह नेशन्स (NGO) चे अध्यक्ष व शिवनेरी सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक छत्रपती आवटे दादा यांचे मोलाचे सहकार्य असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here