Saturday, November 28, 2026
Home ताज्या बातम्या धुळेतील गोरक्षकाच्या घरावरील हल्ल्याने खळबळ! संजय शर्मा प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी...

धुळेतील गोरक्षकाच्या घरावरील हल्ल्याने खळबळ! संजय शर्मा प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करा, श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानची मागणी हल्लेखोरांवर कारवाईची मागणी, गोरक्षकावर दाखल गुन्ह्याच्या तपासाबाबतही उपस्थित केले प्रश्न

0
2
धुळेतील गोरक्षकाच्या घरावरील हल्ल्याने खळबळ! संजय शर्मा प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करा, श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानची मागणी  हल्लेखोरांवर कारवाईची मागणी, गोरक्षकावर दाखल गुन्ह्याच्या तपासाबाबतही उपस्थित केले प्रश्न

जामखेड न्युज – – – – – – 

धुळेतील गोरक्षकाच्या घरावरील हल्ल्याने खळबळ! संजय शर्मा प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करा,
श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानची मागणी

हल्लेखोरांवर कारवाईची मागणी, गोरक्षकावर दाखल गुन्ह्याच्या तपासाबाबतही उपस्थित केले प्रश्न

धुळे शहरातील गोरक्षक संजय शर्मा यांच्या निवासस्थानी झालेला हल्ला आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानच्या धुळे जिल्हा कार्यालयाची तोडफोड झाल्याच्या कथित घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानच्या जामखेड तालुका शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी धुळे येथे गोरक्षक संजय शर्मा यांच्या घरावर हल्ला झाल्याची तसेच संघटनेच्या जिल्हा कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गंभीर असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. या घटनेमुळे धुळे शहरासह राज्यातील गोरक्षक आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दुसरीकडे, गोरक्षणाचे कार्य करणाऱ्या संजय शर्मा यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याने तपासाच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
घटनेमागील नेमकी कारणे, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि हल्ल्यात सहभागी असलेल्यांची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची कोणत्याही राजकीय दबावाशिवाय पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना पांडुराजे भोसले म्हणाले, “गोरक्षणाचे काम निष्ठेने करणाऱ्या धारकरी बांधवांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांत वाढले आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही. या प्रकरणातील सत्य समोर आलेच पाहिजे.”

संघटनेच्या प्रमुख मागण्या
१. धुळे येथील हल्ल्याची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
२. संजय शर्मा यांच्यावरील दाखल गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करून, ते निर्दोष आढळल्यास कायद्यानुसार योग्य निर्णय घ्यावा.
३. संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करून कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानच्या जामखेड तालुका शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!