Saturday, November 28, 2026
Home ताज्या बातम्या दिशादर्शक फलकांचा भोंगळ कारभार! जामखेडचा बाण बीडकडे , वाहनचालकांची दिशाभूल दिघोळ...

दिशादर्शक फलकांचा भोंगळ कारभार! जामखेडचा बाण बीडकडे , वाहनचालकांची दिशाभूल दिघोळ फाटा–जातेगाव फाट्यावर चुकीचे दिशादर्शक फलक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर शिवसेना नेते पांडुरंग माने यांचा संताप

0
2
दिशादर्शक फलकांचा भोंगळ कारभार! जामखेडचा बाण बीडकडे , वाहनचालकांची दिशाभूल  दिघोळ फाटा–जातेगाव फाट्यावर चुकीचे दिशादर्शक फलक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर शिवसेना नेते पांडुरंग माने यांचा संताप

जामखेड न्युज – – – – – 

दिशादर्शक फलकांचा भोंगळ कारभार! जामखेडचा बाण बीडकडे , वाहनचालकांची दिशाभूल

दिघोळ फाटा–जातेगाव फाट्यावर चुकीचे दिशादर्शक फलक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर शिवसेना नेते पांडुरंग माने यांचा संताप

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला असून, दिघोळ फाटा ते जातेगाव फाटा मार्गावरील दिशादर्शक फलकांवर चुकीचे बाण दर्शविण्यात आल्याने वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होत आहे. दिशादर्शक फलक असूनही योग्य दिशा मिळत नसल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिघोळ फाट्यावरून पुढे जातेगाव फाट्यावर गेल्यानंतर तेथील दिशादर्शक फलकावर बीडकडे जाण्यासाठी ज्या दिशेने बाण दाखविण्यात आला आहे, त्याच दिशेने जामखेडकडे जाण्यासाठीही बाण दर्शविण्यात आला आहे. प्रत्यक्षात दोन्ही मार्गांच्या दिशा वेगवेगळ्या असताना फलकावर चुकीचे बाण लावण्यात आल्याने वाहनचालकांना नेमके कोणत्या दिशेने जायचे, असा प्रश्न पडत आहे.

दिशादर्शक फलक हे वाहनचालकांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी असतात. मात्र, या ठिकाणी फलकच दिशाभूल करणारे ठरत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेषतः या मार्गावरून प्रथमच प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना चुकीच्या दिशेने जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर प्रकाराबाबत शिवसेना नेते पांडुरंग माने यांनी संताप व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या चुकीच्या दिशादर्शक फलकांची तातडीने पाहणी करून बाणांची दिशा योग्य करावी आणि वाहनचालकांची होणारी दिशाभूल थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

“दिशादर्शक फलक लावून वाहनचालकांना योग्य मार्ग दाखविण्याऐवजी त्यांची दिशाभूल केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने बाणांची दुरुस्ती करावी; अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा शिवसेना नेते पांडुरंग माने यांनी ‘जामखेड न्यूज’शी बोलताना दिला.

आता सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रकाराची दखल घेऊन दिशादर्शक फलकांची दुरुस्ती करणार का, की वाहनचालकांची दिशाभूल सुरूच राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!