कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांची तहान भागविण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार! ५० हजार जलमोती ॲक्वा पाणी बॉक्सचे मोफत वाटप पंढरपुरात शिवसेना व महायुतीचा स्तुत्य सामाजिक उपक्रम, सौ. पायलताई आकाश बाफना यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा
कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांची तहान भागविण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार! ५० हजार जलमोती ॲक्वा पाणी बॉक्सचे मोफत वाटप
पंढरपुरात शिवसेना व महायुतीचा स्तुत्य सामाजिक उपक्रम, सौ. पायलताई आकाश बाफना यांच्या पुढाकारातून वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा
कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर नगरीत विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आणि वारकरी दाखल होत असताना, त्यांच्या सेवेसाठी शिवसेना व महायुतीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात्रेसाठी येणाऱ्या वारकरी बांधवांची तहान भागविण्यासाठी तब्बल ५० हजार जलमोती ॲक्वा पाणी बॉक्सचे मोफत वाटप करण्यात येत असून, या उपक्रमाचे वारकरी भाविकांकडून स्वागत होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने, शिवसेना सचिव राम रेपाळे आणि अहिल्यानगर जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जामखेड येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. पायलताई आकाश बाफना यांच्या पुढाकारातून या सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह विविध भागांतून मोठ्या संख्येने वारकरी येत असतात. अनेक वारकरी पायी दिंडीने प्रवास करून पंढरपूरमध्ये दाखल होतात. यात्रेच्या गर्दीच्या काळात भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, त्यांची गैरसोय होऊ नये आणि उन्हातान्हात प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना दिलासा मिळावा, या सामाजिक भावनेतून ५० हजार पाणी बॉक्स मोफत वितरित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या उपक्रमात शिवसेना नेते आकाश बाफना यांच्यासह जलमोती ॲक्वा इंडस्ट्रीजचे संपूर्ण टीम सदस्य प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे वारकरी बांधवांना पाणी बॉक्सचे वाटप करण्यात आले. केवळ राजकीय कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता वारकऱ्यांच्या सेवेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे.
‘सेवा हीच खरी भक्ती’ या भावनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम कार्तिकी यात्रेतील वारकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत शिवसेना व महायुतीने सामाजिक सेवेचा आदर्श घालून दिला आहे. जामखेडमधील सामाजिक कार्यकर्त्या पायलताई बाफना यांच्या पुढाकाराने पंढरपूरच्या भक्तिमय वातावरणात माणुसकीच्या सेवाभावाची अनोखी अनुभूती पाहायला मिळत आहे.