Saturday, October 17, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड न्यूजच्या बातमीचा दणका! रोहित पवारांच्या सूचनेनंतर देवदैठणमध्ये अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिसांची धडक...

जामखेड न्यूजच्या बातमीचा दणका! रोहित पवारांच्या सूचनेनंतर देवदैठणमध्ये अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई! बातमीची दखल घेत आमदार रोहित पवार ॲक्शन मोडमध्ये, सकाळी आठ वाजताच कारवाईला सुरुवात, ग्रामस्थांसह महिलांकडून जामखेड न्यूजचे आभार!

0
2
जामखेड न्यूजच्या बातमीचा दणका! रोहित पवारांच्या सूचनेनंतर देवदैठणमध्ये अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई!  बातमीची दखल घेत आमदार रोहित पवार ॲक्शन मोडमध्ये, सकाळी आठ वाजताच कारवाईला सुरुवात, ग्रामस्थांसह महिलांकडून जामखेड न्यूजचे आभार!

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड न्यूजच्या बातमीचा दणका! रोहित पवारांच्या सूचनेनंतर देवदैठणमध्ये अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई!

बातमीची दखल घेत आमदार रोहित पवार ॲक्शन मोडमध्ये, सकाळी आठ वाजताच कारवाईला सुरुवात, ग्रामस्थांसह महिलांकडून जामखेड न्यूजचे आभार!

जामखेड तालुक्यातील देवदैठण येथे अवैध दारूविक्रीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांत वादविवाद होत असल्याची बाब समोर आली होती. काही ठिकाणी कौटुंबिक वाद विकोपाला जात असल्याने गावातील महिलांनी अवैध दारूविक्री विरोधात संताप व्यक्त केला होता. या गंभीर प्रश्नाला जामखेड न्यूजने बातमीच्या माध्यमातून वाचा फोडली. या बातमीची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी संबंधित खर्डा पोलीस अधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाला तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून देवदैठण परिसरात अवैध दारूविक्रेत्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका विरोधात गुन्हा दाखल करत हजारो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

देवदैठण गावात अवैध दारूविक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. दारूमुळे घराघरांत भांडणे होत असून, कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद वाढत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे गावातील महिलांनी आणि ग्रामस्थांनी या अवैध व्यवसायावर कायमस्वरूपी आळा घालण्याची मागणी केली होती. काही दिवस दारूबंदी झाल्यानंतर पुन्हा विक्री सुरू झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला होता.

या परिस्थितीवर जामखेड न्यूजने प्रकाश टाकत अवैध दारूविक्रीचा प्रश्न प्रशासनासमोर मांडला. ही बातमी आमदार रोहित पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून कारवाईच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. यानुसार कारवाई झाली तसेच दुपारी एक्साइज विभागाचे कर्मचारी व अधिकारी दाखल झाले पण गावात सकाळीच खर्डा पोलिसांनी कारवाई केल्याने त्यांना काहीच मिळाले नाही त्यांनी गावकऱ्यांना फोन नंबर दिले जर गावात दारू विक्री करत असेल तर सांगा आम्ही कारवाई करतो म्हणून सांगितले. 

आमदारांच्या सूचनेनंतर यंत्रणा सक्रिय!
जामखेड न्यूजच्या बातमीची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि खर्डा पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांना अवैध दारूविक्रीविरोधात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आज सकाळी आठ वाजताच कारवाईला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे.
या कारवाईमुळे अवैध दारूविक्रीच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, गावातील महिलांसह ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जामखेड न्यूजच्या पाठपुराव्याचे ग्रामस्थांकडून कौतुक!

 

लोकांच्या समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका किती महत्त्वाची असते, याचे उदाहरण देवदैठणमधील या घटनेतून समोर आले आहे. गावातील महिलांनी आणि ग्रामस्थांनी अवैध दारूविक्रीचा प्रश्न प्रभावीपणे मांडल्याबद्दल तसेच बातमीची दखल घेत तातडीने कारवाईसाठी पुढाकार घेतल्याबद्दल जामखेड न्यूजचे आभार मानले आहेत.

मात्र, केवळ एक दिवसाची कारवाई नको; अवैध दारूविक्री कायमची बंद होण्यासाठी सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे. गावातील शांतता, महिलांची सुरक्षितता आणि कुटुंबांचे हित लक्षात घेऊन संबंधित विभागाने नियमित तपासणी करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आता
अवैध दारूविक्रीला कायमचा आळा बसतो का, याकडे देवदैठण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!