Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जल्लोषात स्वागत! बोगावत परिवाराची ७५ वर्षांची भाविकसेवेची परंपरा...

जामखेडमध्ये तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जल्लोषात स्वागत! बोगावत परिवाराची ७५ वर्षांची भाविकसेवेची परंपरा अखंड सुरू! दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, आई जगदंबेची कृपा सर्वांवर राहू दे! पलंगाच्या स्वागत सोहळ्यात नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांची प्रार्थना!

0
4
जामखेडमध्ये तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जल्लोषात स्वागत! बोगावत परिवाराची ७५ वर्षांची भाविकसेवेची परंपरा अखंड सुरू!  दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, आई जगदंबेची कृपा सर्वांवर राहू दे! पलंगाच्या स्वागत सोहळ्यात नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांची प्रार्थना!

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडमध्ये तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जल्लोषात स्वागत! बोगावत परिवाराची ७५ वर्षांची भाविकसेवेची परंपरा अखंड सुरू!

दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, आई जगदंबेची कृपा सर्वांवर राहू दे! पलंगाच्या स्वागत सोहळ्यात नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांची प्रार्थना!

श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा अनोखा संगम असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे जामखेड शहरात शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरातील प्रसिद्ध व्यापारी विजय बोगावत व संदीप बोगावत यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या स्वागत सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आणि भाविकांनी मोठी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे, बोगावत परिवाराने गेल्या ७५ वर्षांपासून जपलेली भाविकसेवेची परंपरा यंदाही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे नेली.

दुष्काळाच्या संकटामुळे नागरिक आणि शेतकरी अडचणींचा सामना करत असताना आई जगदंबेने सर्वांना संकटांशी लढण्याचे बळ द्यावे, पाऊस पडून जनजीवन सुखकर व्हावे आणि आई जगदंबेची कृपा सर्वांवर राहावी, अशी प्रार्थना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी यावेळी व्यक्त केली.

बोगावत परिवाराच्या ७५ वर्षांच्या सेवापरंपरेचे कौतुक!
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील विजय बोगावत व संदीप बोगावत यांच्या निवासस्थानी श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाच्या स्वागताचा सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त पलंगासोबत आलेल्या भाविकांसाठी बोगावत परिवाराच्या वतीने स्नेहभोजनासह उपवासाच्या विविध पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या सेवाकार्यामुळे भाविकांना आपुलकीची व भक्तिभावाची अनुभूती मिळाली.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की, बोगावत परिवार गेल्या ७५ वर्षांपासून श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाच्या स्वागतासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा करत आहे. भाविकांसाठी स्नेहभोजन आणि उपवासाच्या पदार्थांची व्यवस्था करण्याची ही परंपरा कौतुकास्पद आहे. अनेक वर्षे सातत्याने सुरू असलेला हा सेवाभावी उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला शोभा
या स्वागत सोहळ्यास ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद, शिवसेना युवा नेते आकाश बाफना, पलंगाचे मानकरी गणेश पलंगे, माजी नगरसेवक अमित जाधव, पिंटूशेठ बोरा, कांतीलाल कोठारी, संदीप बोगावत, विजय बोगावत, राजेंद्र बोगावत, नागेश घायाळ, शरद शिंगवी, कल्पना भळगट, रुपाली बोगावत, सिद्धांत बोगावत, मौसम बोगावत, दिलीप बोगावत, आरोही शिंगवी, सिद्धार्थ शिंगवी, खुशी मुनोत, दीपाली चोपडा, श्लोक चोपडा, संगीता भळगट, देवेन मुनोत, स्विटी पोखरणा, इशा चंगेडिया, अर्चना सुनील मुनोत, मंजुषा अनिल मुनोत, हिंमतलाल शिंगवी, सुधीर भळगट, सुरेश पटवा आणि सुदेश पोखरणा आदी उपस्थित होते.

सोहळा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांचे परिश्रम
आण्णा विटकर, पुजारी जयंत कुलकर्णी यांच्यासह रविंद्र छाजेड, अशोक बाफना, राहुल मोरे, निखिल कुलथे, सतीश वेदपाठक, कुशल खुटाळे, आशुतोष छाजेड, विकास बाफना, चेतन सुराणा, सुयोग चंगेडिया, गणेश वेदपाठक, अभिजित भळगट, प्रतीक शिंगवी, विशाल गुंदेचा, मारुती झगडे, भाऊ चिंचकर आणि अनिकेत शेटे यांनी सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे आणि भाविकांचे बोगावत परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले.

श्रद्धा, परंपरा आणि भाविकसेवेचा वारसा जपणाऱ्या या सोहळ्यामुळे जामखेडमधील धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.

चौकट
पुन्हा एकदा जामखेड हादरलं! चोरटय़ाच्या हल्ल्यात पोलीस रक्तबंबाळ!

जामखेड शहरात तुळजाभवानी मातेचा सातव्या माळेला येणारा पलंग दर्शनासाठी दाखल झाल्याने भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेऊन खिसे कापणारे आणि चोरी करणारे सक्रिय होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, याच गर्दीत खिसे कापताना दिसलेल्या एका कथित सराईत चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करताना त्याने पोलीस कॉन्स्टेबल
कुलदीप घोळवे यांच्या डोक्यात प्रहार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.या प्रकरणी विनोद सखाराम जाधव यांच्या वर जामखेड पोलीस स्टेशनला ३३३ सिरीयस कलम, १२१/२ भारतीय न्याय संहिता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!