महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी रामदास टेकाळे तर सचिवपदी प्रशांत जाधव बिनविरोध!
महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत संघटनेच्या जामखेड तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
तालुका अध्यक्षपदी श्री. रामदास टेकाळे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडणुकीत जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी श्री. गणेश जगदाळे यांची, तर संघटकपदी श्री. सुरेश भवर यांची निवड करण्यात आली. तसेच तालुक्यातील संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित तालुका कार्यकारिणी अशी तालुका कार्याध्यक्षपदी श्री. बाळासाहेब बोराडे यांची निवड झाली. जामखेड मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री. जीवन हांगे, खर्डा मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री. राहुल ढवळे, तर नान्नज मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री. सागर डीसले यांची निवड करण्यात आली.
तालुका सचिवपदी श्री. प्रशांत जाधव, खजिनदारपदी श्री. नितीन शिंदे आणि प्रसिद्धीप्रमुखपदी श्री. संदीप ढवळे यांची निवड झाली. जिल्हा महिला प्रतिनिधी म्हणून श्रीमती राणी चव्हाण, तर महिला तालुका सदस्यपदी श्रीमती शोभा जाधव यांची निवड करण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून श्री. गणेश शेंदुरकर यांनी, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्री. सतीश सरोदे यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री. वैभव साळवे, श्री. अमोल बहिर, श्री. विश्वास तोरडमल, श्री. अण्णासाहेब बिरंगळ आणि श्री. विजय निगुडे यांनी विशेष सहकार्य केले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमुळे जामखेड तालुक्यात संघटनेचे काम अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.