Friday, October 9, 2026
Home राजकारण जामखेडमध्ये सहकारात ‘राळेभात vs घुमरे’ महायुद्ध! जगन्नाथ तात्यांच्या वारसांना रोखण्यासाठी राम...

जामखेडमध्ये सहकारात ‘राळेभात vs घुमरे’ महायुद्ध! जगन्नाथ तात्यांच्या वारसांना रोखण्यासाठी राम शिंदेंनी टाकला ‘घुमरे’ मोहरा!

0
2
जामखेडमध्ये सहकारात ‘राळेभात vs घुमरे’ महायुद्ध!  जगन्नाथ तात्यांच्या वारसांना रोखण्यासाठी राम शिंदेंनी टाकला ‘घुमरे’ मोहरा!

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडमध्ये सहकारात ‘राळेभात vs घुमरे’ महायुद्ध!

जगन्नाथ तात्यांच्या वारसांना रोखण्यासाठी राम शिंदेंनी टाकला ‘घुमरे’ मोहरा!

 

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, जामखेड तालुक्यातील विकास सोसायटी मतदारसंघात यंदा अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सहकार महर्षी स्व. जगन्नाथ तात्या राळेभात यांच्या वारसदार विरुद्ध विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे समर्थित उमेदवार असा हा सामना आहे.

कोण आहेत रिंगणात?
या मतदारसंघातून एकूण ३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.

१) अमोल जगन्नाथ राळेभात पाटील सहकाराची जाण असणारे संचालक म्हणून वेगळा ठसा निर्माण करणारे तरूण म्हणून ख्याती, सहकार महर्षी तात्यांचे चिरंजीव, तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी सहकाराच्या मैदानात दमदार एंट्री करत अर्ज भरला असून, वडिलांचा सहकारी वारसा जपण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

२) सुधीर जगन्नाथ राळेभात:
अमोल यांचे बंधू, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राहिलेले अनुभवी नेते. त्यांनीही जामखेड विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांनी अर्ज भरल्याने चर्चेला उधाण आले आहे.

३) सचिन घुमरे

सहकार क्षेत्रातील बारकाव्यांचा अभ्यास असणारा तरूण म्हणून ओळखले जातात विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राम शिंदे यांनी स्वतः जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर (तिसऱ्या अपत्याच्या नियमा संदर्भातील अडचण आणि घटनात्मक पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी) त्यांनी सचिन घुमरे यांना पुढे केले आहे. त्यामुळे ही लढत आता राळेभात विरुद्ध शिंदे गट अशी झाली आहे.

काय आहे समीकरण?
जामखेड तालुक्यात राळेभात कुटुंबाचा सहकारावर गेल्या अनेक दशकांपासून मोठा प्रभाव आहे. जगन्नाथ तात्या राळेभात यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आधार दिला. त्यांच्या निधनानंतर ही जागा कोण राखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राम शिंदे गटाने घुमरे यांच्या रूपाने नवीन चेहरा देऊन सहकारात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

छाननीत तिन्ही अर्ज वैध ठरले असून, माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल. जर दोन राळेभात बंधूंपैकी एकाने माघार घेतली नाही, तर मतविभाजनाचा फायदा घुमरे यांना होऊ शकतो, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.

या निवडणुकीचा निकाल ३ नोव्हेंबर रोजी लागणार असून, जामखेडचा सहकाराचा गड कोण राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!