Thursday, September 24, 2026
Home ताज्या बातम्या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी जामखेड तालुका शिवसेना व आदर्श फाउंडेशन सज्ज! आकाश बाफना यांच्या...

गणेशभक्तांच्या स्वागतासाठी जामखेड तालुका शिवसेना व आदर्श फाउंडेशन सज्ज! आकाश बाफना यांच्या पुढाकारातून गणेश मंडळांचे उत्साहात स्वागत, आज आणि उद्याही स्वागत सोहळा

0
2
गणेशभक्तांच्या स्वागतासाठी जामखेड तालुका शिवसेना व आदर्श फाउंडेशन सज्ज! आकाश बाफना यांच्या पुढाकारातून गणेश मंडळांचे उत्साहात स्वागत, आज आणि उद्याही स्वागत सोहळा

जामखेड न्युज – – – – – – 

गणेशभक्तांच्या स्वागतासाठी जामखेड तालुका शिवसेना व आदर्श फाउंडेशन सज्ज!

आकाश बाफना यांच्या पुढाकारातून गणेश मंडळांचे उत्साहात स्वागत, आज आणि उद्याही स्वागत सोहळा

 

गणेशोत्सवानिमित्त जामखेड शहरात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांचे जामखेड तालुका शिवसेना व आदर्श फाउंडेशनच्या वतीने उत्साहात सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणारे शिवसेना युवानेते आकाश बाफना यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध गणेश मंडळांचे व गणेशभक्तांचे स्वागत करण्यात येत आहे.

गणेशोत्सव हा भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा सण असून, या पार्श्वभूमीवर जामखेडमध्ये येणाऱ्या गणेशभक्तांना आपलेपणाची भावना मिळावी, या उद्देशाने हे स्वागत करण्यात येत आहे. यावेळी गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.

या उपक्रमात शिवसेना युवानेते आकाश बाफना, प्रा. कैलास माने, पांडुरंग माने, शिवकुमार डोंगरे, शामिर सय्यद, विकास बाफना, दत्ता जगताप यांच्यासह शिवसेना व आदर्श फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

आदर्श फाउंडेशनच्या वतीने आकाश बाफना हे दरवर्षी गणेश मंडळांच्या स्वागतासोबतच त्यांच्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांची दखल घेत मंडळांचा सन्मानही करतात. त्यामुळे या उपक्रमाला गणेश मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने जामखेड शहरात येणाऱ्या सर्व गणेशभक्तांचे जामखेड तालुका शिवसेना व आदर्श फाउंडेशनच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात येत असून, आज आणि उद्याही हा स्वागताचा उपक्रम सुरू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!