Wednesday, September 16, 2026
Home ताज्या बातम्या पाटोदा-खामगाव रस्त्याचा वाद पेटला! जुना रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी लहान मुलां...

पाटोदा-खामगाव रस्त्याचा वाद पेटला! जुना रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी लहान मुलां महिलांसह कुटुंबीयांचे आमरण उपोषण सुरू

0
2
पाटोदा-खामगाव रस्त्याचा वाद पेटला!  जुना रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी लहान मुलां महिलांसह कुटुंबीयांचे आमरण उपोषण सुरू

जामखेड न्युज – – – – 

पाटोदा-खामगाव रस्त्याचा वाद पेटला!

जुना रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी लहान मुलां महिलांसह कुटुंबीयांचे आमरण उपोषण सुरू

 


तालुक्यातील मौजे पाटोदा येथील पाटोदा ते खामगाव रस्त्यालगत पूर्व-पश्चिम दिशेने असलेला जुना रस्ता अडविण्यात आल्याचा आरोप करत तो तातडीने खुला करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली होती तरीही रस्ता खुला न झाल्याने लहान मुले महिला संपूर्ण कुटुंब आज बुधवार दि. १६ पासून आमरण उपोषणास बसले आहेत.

पाटोदा येथील मनोहर भिमराव नवले, किरण भिमराव नवले, शहाजी विनायक नवले, गुरुदास रामदास नवले, अशोक विनायक नवले, ऋषिकेश भास्कर नवले, भाऊ सर्जेराव आमटे व गहिनाथ खरात यांनी तहसीलदार, जामखेड यांच्याकडे हे निवेदन सादर केले होते. आणी आज पासून पासून कुटुंबीयांसह आमरण उपोषण सुरू केले आहे.

पाटोदा ते खामगाव रस्त्यालगत पूर्व-पश्चिम दिशेने सर्व्हे नंबरच्या बांधावरून जाणारा जुना रस्ता अस्तित्वात आहे. हा रस्ता गट क्रमांक १३९/२ मध्ये जाण्यासाठी गट क्रमांक ६८, ६६/१, ६६/२ व ६७ यांच्या बांधावरून पाटोदा-खामगाव रस्त्यापासून जोडला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.

मात्र सदर रस्ता अडविण्यात आल्याने संबंधित नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून जुना रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा निवेदनात उल्लेख
या रस्त्यालगत मुस्लिम, धनगर व मराठा समाजातील नागरिक वास्तव्यास असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रस्त्याचा प्रश्न वेळेत मार्गी न लागल्यास भविष्यात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती अर्जदारांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक पाहून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून रस्ता खुला करून न झाल्यामुळे लहान मुले व महिला संपूर्ण कुटुंब आमरण उपोषणास बसले आहेत.

आता प्रशासन या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून नेमकी वस्तुस्थिती काय आहे, जुना रस्ता महसूल अभिलेखात अस्तित्वात आहे का आणि तो कोणत्या कारणामुळे अडविला गेला आहे, याची चौकशी करून काय निर्णय घेते, याकडे पाटोदा ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!