Wednesday, September 16, 2026
Home ताज्या बातम्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली! पाटोदा येथे सलाईनद्वारे उपचार, डॉक्टरांकडून...

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली! पाटोदा येथे सलाईनद्वारे उपचार, डॉक्टरांकडून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला

0
2
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली!  पाटोदा येथे सलाईनद्वारे उपचार, डॉक्टरांकडून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला

जामखेड न्युज – – – – 

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली!

पाटोदा येथे सलाईनद्वारे उपचार, डॉक्टरांकडून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत बुधवारी, १६ सप्टेंबर रोजी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईच्या दिशेने निघालेल्या जरांगे पाटील यांची पाटोदा येथे प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांच्यावर सलाईनद्वारे उपचार सुरू करण्यात आले आहेत.

जामखेड तालुक्यातील गावोगावच्या लोकांनी नाष्टा चहा जेवण यांची सोय केली होती सकाळ पासून वेगवेगळ्या ठिकाणी लोक सर्व सामुग्री सह तळ ठोकून जरांगे पाटील यांच्या ताफ्याची वाट पाहत आहोत. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली यामुळे अधीकच चिंता वाढली आहे.

उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोठ्या प्रमाणात अशक्तपणा जाणवत असल्याचे वृत्त आहे. वैद्यकीय तपासणीत रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी कमी असल्याचे समोर आल्याचे वृत्त असून, डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे.

पाटोदा येथील विठ्ठल मंदिराच्या भक्तनिवासात सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे. समाजबांधव आणि धार्मिक नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांनी उपचार घेण्यास सहमती दर्शवल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या प्रकृतीमुळे त्यांच्या मुंबईकडे सुरू असलेल्या प्रवासाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. पुढील प्रवासाबाबत निर्णय त्यांच्या प्रकृतीनुसार घेतला जाण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पुढील वैद्यकीय उपचारांबाबत आणि मुंबईच्या दिशेने होणाऱ्या पुढील प्रवासाबाबत आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!