Home शैक्षणिक बातम्या वुशूच्या रणांगणात जिल्ह्यातील खेळाडूंचा थरार! ल. ना. होशिंग विद्यालयात जिल्हास्तरीय शालेय वुशू...

वुशूच्या रणांगणात जिल्ह्यातील खेळाडूंचा थरार! ल. ना. होशिंग विद्यालयात जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ “हार-जीत नव्हे, सहभाग महत्त्वाचा, यश पचवा अन् पराभवाने खचू नका” — प्राचार्य बी. ए. पारखे

0
3
वुशूच्या रणांगणात जिल्ह्यातील खेळाडूंचा थरार! ल. ना. होशिंग विद्यालयात जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ   “हार-जीत नव्हे, सहभाग महत्त्वाचा, यश पचवा अन् पराभवाने खचू नका” — प्राचार्य बी. ए. पारखे

जामखेड न्युज – – – – – 

वुशूच्या रणांगणात जिल्ह्यातील खेळाडूंचा थरार! ल. ना. होशिंग विद्यालयात जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ

“हार-जीत नव्हे, सहभाग महत्त्वाचा, यश पचवा अन् पराभवाने खचू नका” — प्राचार्य बी. ए. पारखे

 

जामखेड येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेचा उत्साहात व दिमाखदार शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील विविध शाळांमधून आलेल्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून, वुशूच्या मैदानावर कौशल्य, चपळाई आणि आत्मविश्वासाची चुरस पाहायला मिळत आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना क्रीडा अधिकारी संतोष वाबळे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी करण्याचे आवाहन केले. खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जिल्ह्याचे तसेच राज्याचे नाव उंचवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान आपल्या Weak Point वर काम करून Strong Point अधिक मजबूत करावा, असा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला. प्रत्येक खेळाडूने आत्मविश्वासाने खेळावे, प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करावा आणि खेळातील शिस्त व नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.

“पंचांचा निर्णय अंतिम”
स्पर्धेदरम्यान पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. त्यामुळे खेळाडूंनी निर्णयाबाबत कोणताही वाद न घालता खिलाडूवृत्ती जपावी, असे आवाहन करण्यात आले. विजय मिळाल्यानंतर यश डोक्यात जाऊ देऊ नका आणि पराभव झाला म्हणून खचून जाऊ नका, असा संदेशही उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना दिला.

 

यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष बी. ए. पारखे यांनी मार्गदर्शन करताना, “खेळामध्ये हार-जीत महत्त्वाची नाही, तर सहभाग आणि खेळातून मिळणारा अनुभव महत्त्वाचा आहे. यश मिळाल्यानंतर ते पचवता आले पाहिजे आणि पराभव झाला म्हणून खचून जाता कामा नये,” असे सांगितले. खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य युवराज भोसले, पर्यवेक्षक सुदाम वराट, मुकुंद राऊत, प्रल्हाद साळुंके, राघवेंद्र धनलगडे, बापू जरे, धीरज पाटील, खराडे सर, संजय डफळ, वुशू संघटनेचे सचिव लक्ष्मण उदमले, रोहित थोरात, विशाल धोत्रे, सुग्रीव ठाकरे यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेतून उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू पुढील स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील, त्यामुळे या स्पर्धेकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!