रात्री-अपरात्री औषधांसाठी धावपळ थांबणार! जामखेडमध्ये ‘सिटी केअर फार्मसी’ २४ तास सेवेत सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते भव्य दालनाचा शुभारंभ, नागरिकांना औषधांसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचीही सुविधा उपलब्ध
रात्री-अपरात्री औषधांसाठी धावपळ थांबणार! जामखेडमध्ये ‘सिटी केअर फार्मसी’ २४ तास सेवेत
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते भव्य दालनाचा शुभारंभ, नागरिकांना औषधांसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचीही सुविधा उपलब्ध
धकाधकीच्या जीवनात आरोग्याशी संबंधित गरजांसाठी औषधे वेळेवर उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक औषधांची गरज भासल्यास नागरिकांची होणारी धावपळ आता थांबणार आहे. जामखेड शहरात ‘सिटी केअर फार्मसी’ या भव्य दालनाचा शुभारंभ विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. या फार्मसीमध्ये २४ तास औषधसेवा उपलब्ध राहणार असल्याने शहरासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास महालिंग नगरे महाराज, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, प्रा. मधुकर राळेभात यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा. राम शिंदे म्हणाले की, धकाधकीच्या जीवनात नागरिकांना आवश्यक औषधे वेळेवर मिळणे गरजेचे आहे. ‘सिटी केअर फार्मसी’च्या माध्यमातून २४ तास औषधसेवा उपलब्ध होणार असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय दूर होईल. भव्य-दिव्य स्वरूपातील हे दालन जामखेडच्या वैभवात भर घालणारे आहे. आता रात्री-अपरात्री औषधांसाठी नागरिकांची होणारी धावपळ थांबणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.
ग्राहकांना केवळ व्यावसायिक सेवा न देता आदर, आपुलकी आणि विश्वासाची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने सेवा देण्याचे आवाहनही प्रा. राम शिंदे यांनी यावेळी केले.
२४ तास औषधसेवा, जीवनावश्यक वस्तूही माफक दरात ‘सिटी केअर फार्मसी’मध्ये दिवसरात्र औषधे उपलब्ध राहणार असून दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तूही माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील तसेच ग्रामीण परिसरातील नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी औषधांची आवश्यकता भासल्यास मोठी सोय होणार आहे.
महालिंग नगरे महाराज यांनी सिटी केअर फार्मसीला शुभेच्छा देताना, या माध्यमातून नागरिकांची सेवा व्हावी आणि संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. येथे २४ तास सेवा उपलब्ध राहणार असून सिटी केअरमधील “केअर” या शब्दाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रा. मधुकर राळेभात यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हे दालन सुरू करण्यात आल्याचे सांगत, फार्मसीच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौरभ यादव यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते औषध विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. मान्यवरांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, डॉ. भगवानराव मुरूमकर, सभापती पै. शरद कार्ले, अमित चिंतामणी, अॅड. प्रविण सानप, तात्याराम पोकळे, पवन राळेभात, अर्जुन म्हेत्रे, प्रा. विकी घायतडक, प्रविण चोरडिया, मोहन पवार, बाजीराव गोपाळघरे, तुषार बोथरा, अल्ताफ शेख, राहुल बेथमुथ्था, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, लहू यादव, अर्थव यादव, वैभव यादव, राजश्री यादव, सुनंदा यादव, अजिंक्य यादव, अक्षय म्हेत्रे यांच्यासह नागरिक, मान्यवर व शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले. जामखेड शहरात २४ तास औषधसेवा उपलब्ध करून देणाऱ्या या नव्या उपक्रमामुळे आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची सुविधा नागरिकांच्या सेवेत दाखल झाली आहे. रात्रीच्या वेळी औषधांसाठी होणारी गैरसोय दूर होणार असल्याने नागरिकांकडून ‘सिटी केअर फार्मसी’च्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.