जामखेडमध्ये २ ऑगस्ट रोजी नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा,
आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या हस्ते होणार गौरव
इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशनच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत साईबन मंगल कार्यालय, कर्जत रोड, जामखेड येथे करण्यात येणार आहे. या भव्य सोहळ्यात देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश (आण्णा) धस हे राहणार असून, सामाजिक कार्यकर्ते तथा जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य (दिल्ली) संजय कोठारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमास जामखेड नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई चिंतामणी, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत तसेच उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय प्रा. मधुकर (आबा) राळेभात, अमित चिंतामणी, रमेश आजबे, डॉ. सुनील गाडे, सौ. शीतल पाचारणे, प्राचार्य डॉ. गौतम केळकर, प्राचार्य बाळासाहेब पारखे, राकेश पवार, सौ. धनश्री ऊगले, नितीन करडूले, प्रा. महादेव मोरे, पत्रकार सुदाम वराट, पत्रकार प्रा. सचिन पवार, बबन मोरे, संतोष आजबे, सागर कोल्हे, विकास भोगील, सौ. मनीषा काळदाते, युवा उद्योजक केतनशेठ भंडारी, साखर सम्राट अशोक चोरडिया, मॅथ्स वर्ल्ड क्लासेसचे प्रा. धनंजय भोसले तसेच महाराष्ट्र सुरक्षा बल, शेकापूर (ता. आष्टी) येथील सचिन बडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी मा. गोपाळभाऊ रक्टाटे आणि मा. बलभीम शेळके यांचे मार्गदर्शन लाभत असून, त्यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम अधिक भव्य स्वरूपात पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी, पुणेच्या अध्यक्षा सौ. अर्चना शेळके, सचिव दादासाहेब शेळके, संचालक मंडळ व शिक्षकवृंद यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मान्यवर आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
अबॅकस व वैदिक गणिताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण करणे, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असून, जामखेडमध्ये होणाऱ्या या पारितोषिक वितरण सोहळ्याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.