Friday, July 10, 2026
Home ताज्या बातम्या 10 हजारांची लाच घेताना सहायक निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात कर्जत कार्यालयात सापळा...

10 हजारांची लाच घेताना सहायक निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात कर्जत कार्यालयात सापळा कारवाई

0
2

जामखेड न्युज – – – – – 

10 हजारांची लाच घेताना सहायक निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात

कर्जत कार्यालयात सापळा कारवाई

शासकीय काम लवकर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक निबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर च्या पथकाने मंगळवारी दि. 10/09/2025 रोजी रंगेहात पकडले.

प्रकरण काय?
तक्रारदार हे कर्जत तालुक्यातील एका विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीकडून मतदारांचा अधिकृत कोटेशन देण्याचा प्रस्ताव सहायक निबंधक यांच्याकडे सादर करायचा होता.

या संदर्भात दि. 05/09/2025 रोजी सोसायटीची मीटिंग बोलावली होती. एका संचालकाची नोटीस वेळेत न पोहोचल्याने सर्वांनी उशिरा सही केली होती. ही बाब सहायक निबंधक मिलिंद प्रल्हादराव राऊत , वय 40, सहायक निबंधक सहकारी संस्था, कर्जत यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी ही तक्रार निकाली काढण्यासाठी तक्रारदाराकडे 10,000 रुपयांच्या लाचीची मागणी केली. यापैकी 10,000 रुपये आरोपीने यापूर्वीच स्वीकारले होते. उर्वरित 15,000 रुपयांसाठी तो सातत्याने तक्रारदारावर दबाव टाकत होता.

सापळा कसा रचला?
या प्रकरणी तक्रारदाराने दि. 09/09/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे लेखी तक्रार दाखल केली. लाच मागणीची पडताळणी करताना आरोपीने पंचांसमक्ष 10,000 रुपये लाच स्वीकारण्यास मान्यता दिली व तडजोडीअंती ती रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.

त्यांनतर दि. 10/09/2025 रोजी लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचला. यावेळी आरोपी लोकसेवकाने तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले.

गुन्हा नोंद
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 नुसार कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सापळा पथक:
पोलीस उप अधीक्षक श्री. अजित त्रिपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, वैभव सुपेकर, बाबासाहेब कराड, हारून शेख यांनी कारवाई केली. तपास अधिकारी: पोलीस निरीक्षक सौ. सविता तांबे, ला.प्र.वि. अहिल्यानगर या आहेत

लाचलुचपत विभागाचे आवाहन:
कोणताही शासकीय अधिकारी लाच मागत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा.
टोल फ्री क्रमांक: 1064

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. भारत तागडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रदीप मैराळे व श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!