Thursday, July 2, 2026
Home ताज्या बातम्या डॉक्टर्स डे, सीए डे व कृषी दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे...

डॉक्टर्स डे, सीए डे व कृषी दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे सामाजिक उपक्रम

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

डॉक्टर्स डे, सीए डे व कृषी दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे सामाजिक उपक्रम

डॉक्टर्स डे, सीए डे व कृषी दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले तसेच जामखेड येथील तपनेश्वर रोडवरील स्मशानभूमीत ‘पसायदान’ फलकाचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अजय साळवे उपस्थित होते. त्यांनी रोटरी क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करताना सांगितले की, “डॉक्टर, सीए आणि शेतकरी हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना रोटरीने वृक्षारोपण व प्रबोधनात्मक फलकाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश दिला आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण व सामाजिक जाणीव वाढीस लागते.”

यावेळी रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे अध्यक्ष डॉ. सादेख पठाण यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “1 जुलै हा दिवस डॉक्टर, सीए व कृषी दिन म्हणून साजरा होतो. या तिन्ही घटकांनी समाज घडवला आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही वृक्षारोपण केले. झाडे हीच खरी संपत्ती असून पुढील पिढीसाठी ती जपणे आपले कर्तव्य आहे.”

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ अशा देशी प्रजातींच्या 51 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. सर्व उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.

तसेच स्मशानभूमीत लावण्यात आलेल्या ‘पसायदान’ फलकाद्वारे संत ज्ञानेश्वरांच्या विश्वशांतीच्या संदेशाचा प्रसार करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. “जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो” या ओळींतून समाजात समता, बंधुता व सेवाभाव वाढीस लागावा, हा यामागील हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे उपाध्यक्ष प्रफुल सोळंकी, डॉ. प्रशांत गायकवाड, संभाजी मुळे, अमोल तातेड, बाळासाहेब पेचे, पत्रकार धनराज पवार, केतन चोरडिया, बाबासाहेब चंदन, हितेश वीर तसेच रोटरी सदस्य, डॉक्टर, सीए, प्रगतशील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल तातेड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!