जामखेड न्युज – – – – – –
वाकीचे सुपुत्र, पोलिस उपअधीक्षक संजय लोहकरे यांचा सेवापूर्ती सोहळा थाटात संपन्न
गुन्हेगारांचा कर्दनकाळ तर सर्व सामान्यांचा अधार म्हणजेच – संजय लोहकरे

“खाकी वर्दी म्हणजे सामान्यांना न्याय मिळवून देणारी ताकद”हे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सिद्ध करणारे वाकी गावचे सुपुत्र व जामखेड तालुक्याचे भूषण मा. श्री संजय महादेव लोहकरे, पोलिस उपअधीक्षक, लोहमार्ग जालना, छ. संभाजीनगर यांचा सेवापूर्ती सोहळा रविवारी (दि. १४ जून २०२६) रोजी मूळगावी वाकी येथे मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

१९९३ बॅचचे कर्तव्यदक्ष अधिकारी
संजय लोहकरे साहेब १९९३ च्या पोलिस उपनिरीक्षक बॅचचे अधिकारी म्हणून पोलिस दलात रुजू झाले. सुरुवातीला नागपूर, त्यानंतर छ. संभाजीनगर, बीड, जालना, अमरावती जिल्ह्यात त्यांनी सेवा बजावली. अखेर लोहमार्ग जालना येथून पोलिस उपअधीक्षक पदावरून दि. ३१ मे २०२६ रोजी ते सेवानिवृत्त झाले.

गाजलेली पोलिस ठाणी : न्यायाची चूल पेटवली
संजय लोहकरे साहेबांच्या कर्तव्यदक्ष कामाची दखल घेणारी काही पोलिस ठाणी विशेष उल्लेखनीय ठरली :
लासूर पो. स्टे. (ता. गंगापूर, जि. छ. संभाजीनगर), परळी पो. स्टे., शिवाजीनगर पो. स्टे., नेकनूर पो. स्टे., गेवराई पो. स्टे., भ्रष्टाचार विरोधी पथक बीड, अंजनगाव सुर्जी पो. स्टे. (अमरावती), जालना शहर पो. स्टेट. या विविध ठिकाणी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. “पोलिस म्हणजे जनतेचा सेवक” हे ब्रीदवाक्य त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

वाकी गावाने केला अभिमानाने सन्मान
लोहकरे साहेबांच्या यशस्वी आणि प्रेरणादायी कामगिरीने प्रेरित होऊन वाकी ग्रामस्थ, ग्रामपंचायत वाकी व पोलिस मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रंथतुला करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी परिसरातील आजी-माजी पोलिस अधिकारी, सरपंच गणेश वायकर , उपसरपंच, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





