जामखेड न्युज – – – – –
फक्राबाद येथील दरोड्याचा उलगडा, जामखेड पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद
फक्राबाद (ता. जामखेड) येथे झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना जामखेड पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक करून गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे.

31 मे 2026 रोजी रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास फक्राबाद येथील कोरबाई आप्पासाहेब आव्हाड यांच्या घरासमोर झोपलेल्या कुटुंबावर अज्ञात आरोपींनी हल्ला केला. आरोपींनी फिर्यादी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 310(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हा गुन्हा कुणाल राजू भोसले (रा. राशीन, ता. कर्जत) याच्यासह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी व इतर साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने राशीन येथे सापळा रचून मुख्य आरोपीसह दोन बालकांना ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींनी इतर 4 ते 5 साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.





