जामखेडच्या शिवप्रेमींची ऐतिहासिक गडकोट जल तीर्थयात्रा, ८३ वर्षांच्या आजोबांनीही सर केले तोरणा-राजगड रोहीडा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथील शेकडो शिवप्रेमींनी अनोखी ‘शिवतीर्थ जल यात्रा’ काढून संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे या मोहिमेत वयोवृद्धांनी सहभाग घेत तरुणांना लाजवेल असा पराक्रम गाजवला.
एका दिवसात तोरणा-राजगड सर या जल यात्रेदरम्यान शिवभक्तांनी किल्ले तोरणा, किल्ले राजगड, किल्ले रोहिडा, तीर्थक्षेत्र मांढरदेवी व कृष्णा नदी अशा पवित्र स्थानांहून जल कलश भरून आणले.
पक्कड पोटफोडे (वय ८३), शिवाजी नाना खंडागळे (वय ७७) व जगदाळे मामा (वय ७३) या वयोवृद्ध शिवभक्तांनी तरुणांना सोबत घेऊन गड चढून दाखवले. एकाच दिवसात तोरणा व राजगड हे दोन दुर्गम किल्ले सर करून तेथील पवित्र जल आणण्याची कामगिरी या मावळ्यांनी फत्ते केली.
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला जलाभिषेक या पवित्र जलाने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवछत्रपतींच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात येणार आहे. अनेक नद्या, तीर्थक्षेत्रे व गडकोटांचे जल एकत्र करून हा अभिषेक सोहळा पार पडेल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
पाच दिवसीय समाजप्रबोधन व भव्य मिरवणूक प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जामखेडमध्ये श्री शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. यानिमित्त राबवण्यात येणार आहेत. तसेच शिस्तबद्ध पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, यामध्ये बाहेर राज्यातील नामांकित वाद्य पथके विशेष आकर्षण ठरणार आहेत.
हा उत्सव गावाचा सण, रयतेचा उत्सव हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून ‘गावाचा सण व रयतेचा उत्सव’ म्हणून साजरा केला जातो, अशी भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली पांडुराजे भोसले यांचे आवाहन अजूनही ज्यांना शक्य असेल त्यांनी नद्यांचे, गडकोटांचे व तीर्थक्षेत्रांचे पवित्र जल घेऊन यावे,” असे आवाहन पांडुराजे भोसले यांनी यावेळी केले ऐन उन्हाळ्यात, दगडधोंड्यांच्या वाटा तुडवत, वयाचा विचार न करता शिवकार्यासाठी धावून येणाऱ्या या मावळ्यांनी श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यास जल आणले.