Tuesday, May 19, 2026
Home ताज्या बातम्या तुकाराम मुंढे यांची ४५ दिवसांत पुन्हा बदली, गेल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत २५...

तुकाराम मुंढे यांची ४५ दिवसांत पुन्हा बदली, गेल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत २५ वेळा बदली

0
2

जामखेड न्युज – – – – – 

तुकाराम मुंढे यांची ४५ दिवसांत पुन्हा बदली, गेल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत २५ वेळा बदली

प्रशासकीय सेवेत अत्यंत डॅशिंग आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची ४५ दिवसांत पुन्हा बदली झाली आहे. त्यांची गेल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत २५ वेळा बदली झाली आहे.

सनदी अधिकारी (IAS) तुकाराम मुंढे यांची १९ मे २०२६ रोजी पुन्हा बदली करण्यात आली असून, त्यांना अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे.

याआधी ते काही काळ दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत होते. आपल्या २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांची ही तब्बल २५ वी बदली आहे.

अवघ्या दीड महिन्यात बदली झाल्याने प्रशासकीय व्यवस्थेच्या निर्णयाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. यंदा तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

काही दिवसांपूर्वी २००५ बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापान, मदत आणि पुनर्वसन, महसूल व वन विभागाच्या महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची केवळ दीड महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. या नियमानुसार तीन वर्ष काम करणे अपेक्षित असताना मुंढे यांची अवघ्या ४५ दिवसांत बदली करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैली आणि निर्णयाने सर्वसामान्यांना नेहमीच दिलासा मिळत आलेला आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही त्यांचा अंकुश असतो, असे बोलले जाते. राजकीय हस्तक्षेपाशिवाय निर्णय घेण्याच्या वृत्तीमुळे सत्ताधाऱ्यांच्या पसंतीस उतरत नाहीत, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे. शासनाने त्यांना लवकरात लवकर नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल करण्यात आला होता. पोलीस दलातील तब्बल ९६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, संभाजीनगरमधील अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अप्पर पोलीस महासंचालक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्देश दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!