महाराष्ट्र दिनी जामखेड नगरपरिषदेकडून २.४५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जामखेड नगर परिषदेकडून तब्बल २.४५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात पार पडले. जामखेड शहराच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांनी सांगितले.
नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांच्या हस्ते,भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर आबा राळेभात, उपनगराध्यक्ष पोपटनाना राळेभात मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले की,“सभापती प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
महाराष्ट्र दिनाच्या मंगलदिनी या विकासकामांचा शुभारंभ करतानाआनंद होतआहे. विविध योजनांच्या माध्यमातून कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू असून,आगामी काळात जामखेडकरांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत.” त्या पुढे म्हणाल्या की, “भूतकाळातील गोष्टी बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून शहराच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत. हा बदल नागरिकांनाही जाणवत आहे.”
या अंतर्गत करण्यात येणारी प्रमुख कामे पुढीलप्रमाणे:जामखेड नगर परिषद वैशिष्ट्यपूर्ण निधी योजनेअंतर्गत विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून त्यामध्ये भुतवडा येथील डोके वस्तीपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता,स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज व सीडी वर्कसंताजी नगर ते मराठी शाळा दरम्यान स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईन पन्हाळकर यांच्या घरापासून जुना शिरूर रोडपर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता व सीडी वर्क शांतिनाथ महाराज सेवा आश्रम येथे मंदिर बांधकाम जुना शिरूर रोड ते राळेभात वस्ती भरावकाम
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह बांधकाम अहिल्या वस्ती येथे सिमेंट काँक्रिट रस्ता श्री मारुती मंदिर,पोकळे वस्ती येथे सभा मंडप बांधकाम चुंबळी येथे शिवाजी हुलगुंडे ते नवनाथ हुलगुंडे रस्ता खडीकरण व मजबुतीकरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते घायतडक यांच्या घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण यापैकी श्री हनुमान मंदिर सभा मंडपासह दोन कामांचे लोकार्पण करण्यात आले.
उर्वरित सर्व कामांचे भूमिपूजन यावेळी पार पडले.या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर,नगरपरिषदेचे नगरसेवक-नगरसेविका व भाजपाचे पदाधिकारी यांच्या सह प्रभागातील नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.