Monday, April 27, 2026
Home ताज्या बातम्या कामातील विलंबाबाबत आमदार रोहित पवारांचा अधिकाऱ्यांना जाब, अधिकारी धारेवर जामखेड पंचायत...

कामातील विलंबाबाबत आमदार रोहित पवारांचा अधिकाऱ्यांना जाब, अधिकारी धारेवर जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक

0
2

जामखेड न्युज—–

कामातील विलंबाबाबत आमदार रोहित पवारांचा अधिकाऱ्यांना जाब, अधिकारी धारेवर

जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक

 

आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जामखेड पंचायत समितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी कृषी, महावितरण, महसूल आणि पंचायत समितीशी संबंधित विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीत त्यांनी संबंधित विभागांशी निगडित नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेतल्या आणि त्या जागीच सोडविण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या.

दरम्यान, अनेक कामांमध्ये होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. काही ठिकाणी कामातील त्रुटी आणि निष्काळजीपणावरून संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

“नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळालाच पाहिजे आणि प्रलंबित कामे लवकर पूर्ण झाली पाहिजेत,” अशी ठाम भूमिका आ. रोहित पवार यांनी आढावा बैठकीत मांडली.

तसेच येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या तयारीचाही सखोल आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे आणि इतर आवश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध आणि प्रभावी कामकाज करण्याचे आदेश त्यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तत्परतेने प्रतिसाद द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या बैठकीस बीडीओ, संबंधित विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

एकूणच, या बैठकीतून नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून प्रशासनालाही अधिक गतिमान आणि जबाबदार बनण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!