Tuesday, February 24, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड शहरात प्रतिष्ठित, राजकीय पदाधिकारी यांचेच अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमण व...

जामखेड शहरात प्रतिष्ठित, राजकीय पदाधिकारी यांचेच अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमण व कामातील अनियमिततेबाबत अवधूत पवार यांचे आजपासून उपोषण सुरू

0
3

जामखेड न्युज—–

जामखेड शहरात प्रतिष्ठित, राजकीय पदाधिकारी यांचेच अतिक्रमणे

राष्ट्रीय महामार्गालगत अतिक्रमण व कामातील अनियमिततेबाबत अवधूत पवार यांचे आजपासून उपोषण सुरू

जामखेड शहरात अनेक स्वत: ला प्रतिष्ठित समजतात तसेच अनेक राजकीय पदाधिकारी यांचेच अतिक्रमणे आहेत. गोरगरीब नागरिकांवर दबाव आणून त्यांना टपऱ्या काढावयास भाग पाडले पण मोठ मोठ्या लोकांचे अतिक्रमणे तशीच आहेत विशेष म्हणजे काही लोकांनी राजकीय वजन वापरून ग्रामपंचायत असताना अतिक्रमणीत जाग्याच्या नोंदी स्वतःच्या नावे करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे बीड रोड तसेच भुतवडा रोड हे अतिशय लहान झाले आहेत. यामुळे अतिक्रमणे कधी निघणार व शहर मोकळा श्वास कधी घेणार असाच प्रश्न निर्माण झाला आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548-D लगतच्या अतिक्रमण व अनियमिततेबाबत कारवाई न झाल्याने आजपासून सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार हे आमरण उपोषणाला बसले आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या भुमीकेकडे लक्ष लागले आहे. यावेळी अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी अवधूत पवार यांना पाठिंबा दिला आहे. 

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D लगतच्या अतिक्रमण व विविध अनियमिततेबाबत प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने आज दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार आमरण उपोषणाला बसले आहेत. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना सादर करण्यात आले आहे.

जामखेड शहर हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D लगतची पक्की अतिक्रमण,रस्त्याच्या कामातील अनियमितता,निकृष्ट दर्जा, जियो-टॅगिंगमधील संभाव्य फेरफार तसेच महावितरणच्या विद्युत खांबांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत निवेदन देण्यात आले आहे.

यापूर्वी दिनांक ९/०२/२०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये १५ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोकशाही व संविधानिक मार्गाने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आजपर्यंत प्रत्यक्ष आणि परिणामकारक कारवाई न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

प्रमुख मागण्या –
१.राष्ट्रीय महामार्ग क्र. 548-D लगतच्या जामखेड शहर हद्दीतील सर्व अतिक्रमणांवर नियमानुसार व निष्पक्ष कारवाई करावी.
२.रस्त्याच्या कामाबाबत स्वतंत्र तांत्रिक चौकशी समिती नेमावी.
३.डीपीआर, जियो-टॅगिंग नोंदी व प्रत्यक्ष मोजणीची सखोल पडताळणी करून दोषींवर कारवाई करावी.
४.महावितरणच्या विद्युत खांबांबाबत तातडीने सुरक्षिततेची उपाययोजना करावी.
५.वाहतूक कोंडीची समस्या तात्काळ मार्गी लावावी.
महामार्गाचा हा प्रश्न केवळ विकासापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सुरक्षितता, वाहतूक सुरळीतता आणि प्रशासनाच्या निष्पक्षतेशी संबंधित असल्याचे पवार यांनी नमूद केले.नेहमी हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांची अतिक्रमणे हटवून पक्की बांधकामे कायम ठेवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

 

प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास उपोषण अधिक तीव्र करण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!