जामखेड न्युज——–
महाशिवरात्रीनिमित्त मल्लिकार्जुन मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहास सुरवात
भगवान शैल्य मल्लिकार्जुन नागेश्वर यांचा महाशिवरात्रीनिमित्त शिवलीला अमृत पारायण व अखंड हरीणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे या वर्षीचे नववे वर्षे आहे. मंगळवार दि १० फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी पर्यंत मल्लिकार्जुन मंदिर, सुतार गल्ली, या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले आसुन जास्त जास्त भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मल्लिकार्जुन मंदिर सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.

मंगळवार दि. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. गोरक्ष महाराज भिलारे, (गोमळवाडा), बुधवार दि ११ फेब्रुवारी रोजी हा. म. प. उत्तम महाराज वराट, (साकत), गुरूवार दि, १२ फेब्रुवारी ह.भ.प. प्रमोद महाराज काळे (आळंदी), शुक्रवार, दि १३ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज नगरे (आळंदी), शनिवार दि १४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. दिपक महाराज बादाडे (परभणी), तर रविवार दि १५ फेब्रुवारी रोजी रात्री १० ते १२ या वेळेत ह.भ.प.रहिदास महाराज शास्त्री (हातोला) व सोमवार दि १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सागर महाराज काचोळे, (जवखेडा कन्नड) यांची किर्तने होणार आहेत. यानंतर मंगळवार दि १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ वाजता हा.भ.प. सतिष महाराज कदम (भुम) यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.

याच बरोबर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन ११ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते दहा रोजी शिवलीलाअमृत पारायण होणार आसुन या मध्ये ह. भ. प. ईश्वर महाराज तौर (आळंदी देवाची) हे शिवलीला अमृत पारायणाचे वाचन करणार आहेत. रविवार दि १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ महापुजा, ८ ते १० शिवलीला अमृतपारायण, ११ ते १२ भजन, दुपारी २ ते ५ ते महीला भजन, सायंकाळी ५:३० ते ६:३० हरीपाठ तर दररोज सायंकाळी ७ ते ९ विविध नामांकित महाराजांची कीर्तने होणार आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या या सप्ताहात मंगळवार दि १० फेब्रुवारी पासुन सुरवात झाली आहे.
सुतार गल्ली येथील मल्लिकार्जुन मंदिर, याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले आसुन जास्त जास्त भाविकांनी या अखंड हरीणाम सप्ताहास उपस्थित राहण्याचे आवाहन मल्लिकार्जुन मंदिर सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.





