Home ताज्या बातम्या तलावातील विद्युत मोटर काढून घे म्हणल्याचा राग आल्याने तलवार घेऊन जीवे मारण्याची...

तलावातील विद्युत मोटर काढून घे म्हणल्याचा राग आल्याने तलवार घेऊन जीवे मारण्याची धमकी जामखेड तालुक्यातील कोल्हेवाडी येथील घटना

0
12

जामखेड न्युज—–

तलावातील विद्युत मोटर काढून घे म्हणल्याचा राग आल्याने तलवार घेऊन जीवे मारण्याची धमकी

जामखेड तालुक्यातील कोल्हेवाडी येथील घटना

       

जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कोल्हेवाडी येथील पाझर तलाव नं २ येथील पाणीसाठा उन्हाळ्यात उपयोगी यावा म्हणून शेतीच्या सर्व विद्युत मोटारी बंद कराव्यात तसा ग्रामपंचायत मध्ये ठराव घेतला तरीही काही तरुणांनी आपल्या मोटारी बंद केल्या नाहीत यानंतर तहसीलदार यांना निवेदन दिले तरीही आदेश बळीराम सरोदे याची विद्युत मोटार सुरूच होती म्हणून आज सोमवार दि. ९ रोजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पाणीपुरवठा कर्मचारी, रामनगर, कोल्हेवाडी नागरिक तलाव परिसरात गेले व मोटार बंद करावी म्हणून सरोदे यास सांगितले असता तलवार घेऊन जमावासमोर दहशत निर्माण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तशी तक्रार कोल्हेवाडी ग्रामस्थांनी जामखेड पोलीसांना दिली आहे.

जामखेड पोलीसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, मौजे कोल्हेवाडी येथील पाझर तलाव नं २ मध्ये पाणी साठा शिल्लक राहून सदरचा पाणी असुन सदरचा पाणी साठा उन्हाळी हंगामामध्ये जनवारांना पाणी पिण्यासाठी तसेच जंगली जनावरे यांना पाणी पिण्यासाठी साठा नागरिकांना पाणी पिण्यासाठी तसेच अत्यंत आवश्यक आहे.

तसेच सदरचा पाणी साठयाचा उपसा करू नये म्हणुन साकत ग्रामपंचायत यांनी दिनांक ३०/१२/२०१४ रोजी ठराव नं. ०७ अन्वये सर्वानुमते मंजुर केलेला आहे तसेच ग्रामपंयालय सदस्य यांनी दिनांक २३/०१/२०१६ रोजी मे तहसिलदार साहेब मौजे कोल्हेवाडी येथील सदर ठिकाणचा पाणी उपसा करू नये म्हणुन लेखी निवेदन दिलेले आहे.

असे असतांना आज दिनांक ०९/०२/२०१६ रोजी सकाळी १०:०० वाजलेचे सुमारास ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी, सरपंच व वस्तीवरील महिला व नागरिक हे सदर पाझर तलाव ग्रामपंचायत सदस्य,
पाझर तलाव नं. २ पुरवठा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता सदर ठिकाणी आदेश बळीराम सरोदे यांची असलेली विदयुत इलेक्ट्रीक मोटार काढून घ्या व पाणी उपसा करू नका असे म्हणाले असता ग्रामचांयत सदस्य राजेंद ग्यानबा कोल्हे यांच्यावर सरोदे हा तलवार घेवून धावला त्याची व्हिडीओ रेकॉर्डींग केलेली आहे. तसेच मोठ मोठ्याने घाण घाण शिवीगाळ करू लागला व ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी व सदस्य यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

सदर ठिकाणची विदयुत इलेक्ट्रीक मोटार काढून घेणार नाही माझे मोटारीस कोणी हात लावल्यास त्यांचे कुटुंबाचा बिमोड करून टाकील अशी धमकी दिली म्हणून आदेश सरोदे यांच्या विरुध्द आमची रितसर कायदेशीर फिर्याद असुन तीची चौकशी होवून सदरच्या गुंड प्रवृत्ती च्या इसमावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोल्हेवाडी रामनगर नागरिकांनी केली आहे.

आदेश सरोदे हा आडदांड व नंगड प्रवृत्तीचा असुन त्यांचा खुपमोठा जोड जमाव आहे तसेच याला राजकीय पाठबळ असुन त्याचा मामा पुणे येथे वकीली करीत आहे त्यामुळे सदरचा इसम कधी काय करील याचा भरवसा राहिलेला नाही त्याचे पासुन आमचे व आमचे कुटुंबियांचे जिवीतास धोका निर्माण झालेला आहे त्यामुळे सदरच्या इसमाविरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करून आम्हाला न्याय मिळुन दयावा अशी मागणी केली आहे.

जामखेड पोलीस वरील प्रकरणाचा तपास करत आहेत. निवेदनावर कोल्हेवाडी, रामनगर येथील अनेकांच्या सह्या आहेत. 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!