Thursday, February 5, 2026
Home ताज्या बातम्या पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडुन मृत्यू जामखेड तालुक्यातील घटना

पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडुन मृत्यू जामखेड तालुक्यातील घटना

0
2

जामखेड न्युज——-

पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा विहिरीत बुडुन मृत्यू, जामखेड तालुक्यातील घटना

         

अहिल्यानगर येथुन जामखेड तालुक्यातील धानोरा या ठिकाणी आपल्या नातेवाईकडेआलेल्या आवेज रिजवान पठाण वय १७ वर्षेया मुलाचा विहिरीतील पाण्यात बडुन मृत्यू झाला. आवेज हा आज सकाळी मित्रांसोबत विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता या वेळी ही दुर्घटना घडली. या प्रकरणी जामखेड पोलीसस्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत पठाण (रा. गांधीनगर, बोल्हेगाव हा धानोरा या ठिकाणी मामे बहीणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आला होता. रात्री वाढदिवस झाल्यानंतर आवेद हा चुलत भाऊ व मित्र त्या रात्री मुक्कामासाठी धानोरा या ठिकाणी नातेवाईकडे थांबले होते. दुसर्‍या दिवशी गुरूवारी आठ वाजण्याच्या सुमारास पठाण हा चुलत भाऊ अन्वर पठाण व जय आरू असे तिघेजण धानोरा येथील घराजवळील विहीरीवर पोहायला गेले होते. यावेळी आवेज याने विहीरीत उडी मारली.

मात्र, तो पाण्यातून वर आलाच नाही म्हणून त्याचा चुलत भाऊ व मित्र या दोघांनी मोठ्याने आरडाओरड केला. त्यांचा आवाज ऐकून वस्तीवरील नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. यानंतर पोलीस पाटील योगिनाथ जायभाय यांना फोनद्वारे माहीती दिली.

पिंपरखेड येथील रफीक अब्बास सय्यद वय 54 यांनी 23 फुट खोल पाण्यात बुडी घेऊन अवेज याचा मृतदेह पाण्याच्या वरती काढला. सकाळी आठ वाजता बुडालेल्या आवेजचा मृतदेह दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बाजेच्या सहाय्याने मृदतेह पाण्यातुन विहिरीच्या बाहेर म्हणजे तब्बल सहा तासांनी बाहेर काढण्यात आला.

यावेळी वाजिद पठाण, हरीदास शिरगिरे, बालाजी शिंदे, भाऊराव काळे, लाला शिंदे, बाबुराव वाघ, सिकंदर शेख, सलीम शेख यांनी त्यांना मदत केली.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक पुष्कर कडु, उपनिरीक्षक सलिम शेख, जितेंद्र सरोदे, योगेश दळवी, मंडल अधिकारी विजय चव्हाण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!