Thursday, March 5, 2026
Home ताज्या बातम्या गोव्याच्या ट्रॅकवर अहिल्यानगरची सुवर्णधाव, जामखेडच्या शुभम हंबीररावला 200 मीटर ॲथलेटिक्समध्ये राष्ट्रीय...

गोव्याच्या ट्रॅकवर अहिल्यानगरची सुवर्णधाव, जामखेडच्या शुभम हंबीररावला 200 मीटर ॲथलेटिक्समध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक

0
589

जामखेड न्युज——-

गोव्याच्या ट्रॅकवर अहिल्यानगरची सुवर्णधाव,

जामखेडच्या शुभम हंबीररावला 200 मीटर ॲथलेटिक्समध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक

भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल गेम्स 2025-26 स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचा सुपुत्र शुभम सीमा अरुण हंबीरराव याने ॲथलेटिक्सच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

20, 21 व 22 जानेवारी रोजी गोव्यातील पोद्देम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मापुसा येथे झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशातील विविध राज्यांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तीव्र स्पर्धेत शुभमने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

शुभम हा भा.पां. हिवाळे शिक्षणसंस्थेच्या सीएसआरडी मधील एम.एस.डब्ल्यू. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून, राणा सिंग व शंकर गायकवाड पाटील यांच्या हस्ते त्याला ट्रॉफी व पदक प्रदान करण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हळगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शुभमच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आई-वडील शेती करून कुटुंबाचा गाडा चालवतात. आजी-आजोबा, चुलता-चुलती व त्यांची मुले असे एकत्र कुटुंब असलेल्या या घरातून राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता घडल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे.

या यशाबद्दल सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे यांनी शुभमचे विशेष अभिनंदन केले असून. 

त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शुभमच्या या सुवर्णयशाने अहिल्यानगर जिल्ह्याचा क्रीडाक्षेत्रातील लौकिक आणखी उजळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!