Wednesday, April 29, 2026
Home ताज्या बातम्या मणिकर्णिका घाटाचे संरक्षण करा – सभापती प्रा. राम शिंदे मुख्यमंत्री योगी...

मणिकर्णिका घाटाचे संरक्षण करा – सभापती प्रा. राम शिंदे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

0
498

जामखेड न्युज——-

मणिकर्णिका घाटाचे संरक्षण करा – सभापती प्रा. राम शिंदे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

 

 

वाराणसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला ऐतिहासिक मणिकर्णिका घाटाच्या संरक्षणाबाबत निर्माण झालेल्या गंभीर बाबींसंदर्भात विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित कागदपत्रांसह निवेदन सादर केले आहे.

वाराणसीतील ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर मणिकर्णिका घाटाच्या नूतनीकरणादरम्यान होणारी पडझड थांबवून त्याचे संरक्षण व संवर्धन करावे, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केली आहे.

लखनौ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, वाराणसी केवळ एक शहर नाही, तर ते श्रद्धा, साधना आणि मोक्षाची अखंड चेतना आहे. गंगेच्या तीरावर वसलेले ८४ घाट म्हणजे काशीचा श्वास असून, त्यातील मणिकर्णिका घाट सनातन परंपरेतील सर्वोच्च आध्यात्मिक प्रतीक मानले जाते. काशीत मरण म्हणजे मोक्ष ही धारणा याच भूमीशी अविभाज्य रित्या जोडलेली आहे.

ज्या सरकारने मंदिरासारखे शतकानु शतकांची स्वप्न साकार केले, आणि काशी विश्वनाथ धामसारखा श्रद्धेचा सन्मान करणारा प्रकल्प पूर्ण केला, तेच सरकार मंदिरे तोडते, असा आरोप निराधार,राजकीय हेतूने प्रेरित आणि दिशाभूल करणारा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

चौकट
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वंशज या नात्याने, या विषयाकडे केवळ प्रशासकीय नव्हे, तर धर्म, परंपरा आणि कर्तव्यभावनेतून पाहतो. या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी थेट संवाद साधून, ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाबाबत भूमिका मांडली.

– राम शिंदे, सभापती, विधानपरिषद

 

चौकट
जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व मूर्ती आणि धरोहर सुरक्षित असल्याचे सांगून पुनर्विकासानंतर त्या पुन्हा स्थापित केल्या जातील असे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!