महंत विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने जमादारवाडी सप्ताहाची सांगता जमदारवाडी ग्रामस्थ जपताहेत तीन पिढ्यांचा वारसा

0
182

जामखेड न्युज——-

महंत विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने
जमादारवाडी सप्ताहाची सांगता

जमदारवाडी ग्रामस्थ जपताहेत तीन पिढ्यांचा वारसा

संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन जमादारवाडी येथील संत वामनभाऊ गड या ठिकाणी गेली अकरा वर्षांपासून करण्यात येत आहे आणि या सप्ताहाची सांगता महंत विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. 

हजारो भाविक भक्तांच्या पंक्ती जेवणासाठी बसल्या आणी आवघ्या काही मिनिटात जेवणाची वाढही झाली त्यामुळे महंत विठ्ठल महाराज यांनी शिवशक्ती तरूण मंडळाचे व ग्रामस्थांचे कौतुक केले.

जमादारवाडी ग्रामस्थ पिढ्यांन पिढ्या हा वारसा जपत आले आहेत बदलत्या काळानुसार घाईगडबडीच्या युगात कोणतेही कार्य आसले की पहिल्या पंगतीला जेवण कराचे आणि तिथुन निघायचे आसं ठरलेले असते परंतु जमादारवाडी येथे जेवन वाढप्यांची एक वेगळी प्रथा आहे.

धार्मिक कार्यक्रम लग्न समारंभसह कोणतीही भोजनाची पंगत आसली तरी प्रथम आलेल्या पाहुण्यांना जेवन वाढण्यासाठी आजोबा मुलगा आणि नातु सज्ज आसतात त्यामुळे पंचक्रोशीत जमादारवाडीच्या या कार्याचे नेहमी कौतुक होत आसते. 

संत वामनभाऊ गड या ठिकाणी दररोज सात ते नऊ किर्तन सेवा संपन्न झाली आणि त्यानंतर दररोज मिष्टान्नाच्या भोजन पंक्ती झाल्या आणी वाढप्यांनी आपली जबाबदारी पार पाडली तसेच जमादारवाडी गावातही श्रावणात आसाच नामयज्ञ संपन्न होत आसतो त्या ठिकाणीही आसेच नियोजन होत आसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here