खर्डा पोलीस व युवकांनी विहिरीत पडलेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण
तालुक्यातील खर्डा येथे सरकारी दवाखान्यामागील विहिरीत पडलेल्या व्यक्तीला युवकांच्या व पोलिसांच्या तत्परतेने प्राण वाचवले आहेत या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.
खर्डा येथील सरकारी दवाखान्यामागील विहिरीत दि.१६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संजय परमार (राहणार, खर्डा) हे पडले होते. ही घटना १७ जानेवारी रोजी अजय ढाळे यांना कळली.
त्यांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधला आणि पोलिसांच्या साहाय्याने संजय परमारला विहिरीतून बाहेर काढून जीव वाचवण्यात यश मिळवले.
त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.अजय ढाळे व पोलिसांच्या तत्परतेमुळे विहिरीत पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचले. यामुळे खर्डा परिसरातील नागरिकांमध्ये त्यांचे जोरदार कौतुक होत आहे.
विहिरीतून संजय परमारला काढण्यासाठी पोलिस नाईक संभाजी शेंडे, पोलिस कॉन्स्टेबल अशोक बडे, धनराज बिराजदार, गोरख (नाना) ढाळे, सागर पवार, बालाजी येवले व प्रमोद निकम यांनीही मदतीचा हातभार लावला.