देशाचे खरे हिरो सैनिकच – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी शिवनेरी अकॅडमी व त्रिदल आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने नगरपरिषदेचे पदाधिकारी व पत्रकारांचा संयुक्त सत्कार संपन्न

0
167

जामखेड न्युज—–

देशाचे खरे हिरो सैनिकच – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

शिवनेरी अकॅडमी व त्रिदल आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने नगरपरिषदेचे पदाधिकारी व पत्रकारांचा संयुक्त सत्कार संपन्न

ज्या मातेने हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली अशा राजमाता जिजाऊंच्या विचारातून जामखेड शहराचा कारभार करताना सर्वच नगरसेवकांना विश्वासात घेऊन, जामखेड शहराच्या सर्व योजना पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता, अशी सर्व कामे करण्याबरोबरच निवडणुकीत त्रिदल आजी- माजी सैनिक संघटनेला दिलेल्या आश्वासनानुसार विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहरात एक सैनिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल. कारण या देशाचे खरे हिरो सैनिकच आहेत. असे नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले.

जामखेड नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी व सर्वपक्षीय नगरसेवक तसेच पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा सत्कार समारंभ जामखेड येथील त्रिदल आजी- माझी सैनिक संघटना व जेथे आम्ही सैनिक घडवतो अशा शिवनेरी अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. शिवनेरी करिअर अकॅडमीच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, मल्लविद्या संस्कार कुस्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबन (काका) काशिद, जामखेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, भाजपाचे गटनेते तथा नगरसेवक तात्याराम पोकळे, नगरसेवक मोहन पवार, नंदा होळकर, जया गव्हाळे, पोपट राळेभात, श्रीराम डोके, हर्षद काळे, प्रा. विकी घायतडक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक राजेंद्र गोरे व वसीम सय्यद वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका संगीता भालेराव

शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रविण होळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद,समता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष गव्हाळे, सागर टकले, बबलू टेकाळे, माजिद कुरेशी, अशोक शेळके, डॉ. कैलास हजारे आदी मान्यवरांबरोबरच पत्रकार, त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे, उपाध्यक्ष कांतीलाल कवादे, सचिव शहाजी ढेपे, कोषाध्यक्ष राजकुमार भराटे, सल्लागार सुग्रीव अडाले, मार्गदर्शक अरविंद जाधव, संचालक हरिभाऊ कदम, अमोल राऊत, पोपट सांगळे, सदस्य दत्तात्रय डिसले, बाळू कोठाळे, गणेश कदम, मच्छिंद्र माने, संजय गायकवाड, नंदकुमार नागवडे, अंकुश ढवळे, रावसाहेब कापसे, रवींद्र शेळके, बाळू नेमाने, दामोदर राऊत, बबन नाईक, श्रीराम राळेभात सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नगरपरिषद नुतन पदाधिकारी तसेच पत्रकार दिनानिमित्त उपस्थित सर्व पत्रकारांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

जामखेड शहराचा विकास करताना नगराध्यक्षा व नगरसेवक जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच पत्रकारही महत्त्वाचे आहेत. कारण नगरपरिषदेने केलेले चांगले काम आपल्या विविध माध्यमांमधून दाखवण्याचे काम हे पत्रकारांना करायचे आहे. त्यासाठी नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांना चांगले काम करावे लागणार आहे. या दोन्ही घटकांनी जर चांगले काम केले तर जामखेड शहराचा विकास निश्चित आहे. अशा प्रकारे नगरपरिषदेचे पदाधिकारी व पत्रकारांचा त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेने केलेला सत्कार हा खरंच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.

याबरोबरच खेलो इंडिया मध्ये याबरोबरच खेलो इंडिया मध्ये मल्लखांब या खेळात सुवर्णपदक मिळविलेल्या कुमारी स्नेहल भोसले या खेलाडूचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक कांतीलाल कवादे, सूत्रसंचालन सैनिक संघाचे सचिव शहाजी ढेपे तर आभार कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here